आता रेल्वेचे तिकीट रद्द केल्यास पूर्ण परतावा मिळणार? जाणून घ्या नेमका निर्णय काय?(File Photo : Railway Ticket)
नवी दिल्ली : सर्वात आरामदायी आणि किफायतशीर प्रवास म्हणून भारतीय रेल्वेकडे पाहिले जाते. भारतीय रेल्वेकडूनही प्रवाशांच्या सेवेसाठी विशेष महत्त्वपूर्ण पावले उचचली जात आहेत. त्यात आता तिकीटासाठी होणारी पिळवणूक थांबण्याची शक्यता आहे. कारण, या बदलांमुळे, रेल्वे एजंट तात्काळ तिकीट बुक करू शकणार नाहीत. रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि समानता यावी, असा या नियमाचा उद्देश आहे.
भारतीय रेल्वेने केलेले काही बदल आता 15 एप्रिल 2025 पासून अंमलात आणले जाणार आहेत. त्यानुसार, रेल्वे एजंट तात्काळ तिकीट बुक करू शकणार नाहीत. प्रवाशांना तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईल ॲपचा वापर करावा लागणार आहे. रेल्वेच्या या बदलांमुळे, रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि समानता येईल. प्रवाशांना तिकीट मिळवण्यासाठी समान संधी मिळेल, अशी आशा आता व्यक्त केली जात आहे.
खऱ्या प्रवाशांना प्रवासासाठी मिळेल प्रवेश
सुधारित बुकिंग तासांपासून ते एजंट निर्बंध कडक करण्यापर्यंत तसेच नवीन नियमांचा उद्देश गर्दी कमी करणे आणि खऱ्या प्रवाशांना प्रवासासाठी प्रवेश मिळणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. आता हा नियम येत्या 15 एप्रिल 2025 पासून केली भारतीय रेल्वेने तात्काळ तिकिटांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या बदलांमुळे, रेल्वे एजंट तात्काळ तिकीट बुक करू शकणार नाहीत.
…तेव्हाच प्लॅटफॉर्मवर जाण्याची परवानगी
देशातील 60 प्रमुख रेल्वे स्थानके नेहमीच खूप गर्दीची असतात. आता या स्थानकांच्या बाहेर कायमस्वरूपी प्रतीक्षालय बनवले जातील. प्रवाशांना त्यांची ट्रेन येणार असेल तेव्हाच प्लॅटफॉर्मवर जाण्याची परवानगी असेल. यामुळे स्टेशनवरील गोंधळ कमी होईल आणि प्रवाशांना ये-जा करणं ही सोपं होईल. या योजनेची चाचणी नवी दिल्ली, आनंद विहार, वाराणसी, अयोध्या आणि पटना स्थानकांवर सुरू झाली आहे.