(फोटो सौजन्य: Pinterest)
राखी बरोबर भेटवस्तू पाठवण्याचा पर्याय
ऑनलाइन राखी बुक करण्याची सोपी पद्धत वेबसाइट निवडा: तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर आयजीपी किंवा एफएनपीची अधिकृत वेबसाइट उघडा. राखीची निवड सर्च बारमध्ये जाऊन तुमच्या आवडीनुसार डिझायनर राखी, रुद्राक्ष राखी किवा गिफ्ट हॅम्पसे निवडा. पत्ता प्रविष्ट कराः भावाचा अचूक पत्ता, पिनकोड आणि चालू असलेला मोबाईल नंबर भरा डिलिव्हरी पर्यायः जलद पोहोचवण्यासाठी त्याच दिवशी डिलिव्हरी किंवा एक्स्प्रेस डिलिव्हरीचा पर्याय निवडा, पेमेंट करा युपीआय (यूपीआय), डेबिट/क्रेडिट कार्ड किया नेट बँकिंगद्वारे १५ मिनिटांच्या आत ऑनलाइन पेमेंट करून ऑर्डर कन्फर्म करा. तसेच, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, लिंकईट वरूनही तुम्ही सेम डे डिलिव्हरी असणारे राखी कॉम्बाउल पटकन बुक करू शकता.
राखी पोहोचवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध
ऑनलाईन राखी खरेदी केल्यावर त्या साईटवर तुमच्या भावाचा पत्ता, फोन नंबर आणि पिनकोड टाकला की, अवघ्या १० ते १५ मिनिटात तुमच्या भावापर्यंत राखी पोहोचते. अवघ्या १५ मिनिटांमध्ये ऑनलाइन राखी बुक करून तुमच्या भावाला पाठवण्यासाठी तुम्ही आयजीपी किंवा एफएनपी सारख्या लोकप्रिय आणि विश्वासू वेबसाइट्सची मदत घेऊ शकता.
आकर्षक डिझाईन्सचे तीन लिफाफे उपलब्ध
हे लिफाफे ३ वेगवेगळ्या आणि आकर्षक डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत. फक्त शहरातच नाही, तर ग्रामीण भागातील सर्व टपाल कार्यालयांमध्येही हे लिफाफे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या लिफाफ्यांसोबत नागरिकांना ‘स्पीड पोस्ट’ सुविधेचाही वापर करता येणार आहे, ज्यामुळे राखी वेळेत पोहोचेल, असे यावेळी सांगण्यात आले.
स्पीड पोस्ट, नोंदणीकृत टपालाची उत्तम सुविधा
टपाल विभागाने राखी पाठवण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. याद्वारे देश-विदेशात राहणाऱ्या भावंडांपर्यंत राखी आणि भेटवस्तु पाठवणे अधिक सोपं झालं आहे. सुरक्षित पैकिंग, स्पीड पोस्ट, नोंदणीकृत टपाल आणि पार्सल बुकिंगची सुविधा एकाच ठिकाणी मिळेल, असे त्यांनी सांगितले.
पोस्टाचे १२ रुपयांत वॉटरप्रूफ राखी लिफाफे
रक्षाबंधनाच्या पवित्र सणाची तयारी सुरू झाली असून, दूर राहणाऱ्या भावाच्या हातावर वेळेत राखी पोहोचावी यासाठी भारतीय टपाल विभाग सज्ज झाला आहे. पावसाळ्यात राखी भिजून खराब होऊ नये यासाठी टपाल विभागाने वन स्टॉप राखी सोल्युशन अंतर्गत विशेष वॉटरप्रूफ राखी लिफाफे अवघ्या १२ रुपयांत बाजारात आणले आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने टपाल सेवेदरम्यान राखी भिजण्याचा धोका असतो. हे लक्षात घेऊन टपाल विभागाने हे विशेष वॉटरप्रूफ लिफाफे डिझाइन केले आहेत, असे पोस्ट खात्यातर्फे सांगण्यात आले.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






