File Photo : NDA
पाटणा : लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) विजय झाला आहे. त्यामध्ये अनेक छोट्या-मोठ्या पक्षांनी भाजपला पाठिंबा दिला असून, नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. असे असताना आता केंद्रात सत्तेत असलेल्या एका पक्षाने जी भूमिका घेतली आहे ती आता अडचणीची ठरत असल्याचे दिसत आहे.
हेदेखील वाचा : सूर्याच्या प्रखर उष्णतेमागची रहस्ये उलगडणार; जाणून घ्या काय आहेत इस्रोच्या PROBA-3 मिशनचे फायदे
राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षप्रमुख पशुपती पारस यांनी आगामी 2025 बिहार विधानसभा निवडणुकीत सर्व 243 जागा स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. बिहारमधील राजकीय गणितांमध्ये सातत्याने बदल होत असताना आणि पारस यांच्या पक्षाची स्थितीही स्पष्ट नसताना हे वक्तव्य समोर आले आहे. पशुपती पारस म्हणाले, ‘आमचा पक्ष सर्व 243 जागांवर निवडणूक लढवणार आहे. आमचे कार्यकर्ते सर्व बूथवर निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत’.
तसेच युतीसोबत करार झाला आणि त्यांना अपेक्षित जागा मिळाल्या तर मित्रपक्षांसोबत निवडणूक लढवण्यास तयार आहे. मात्र, त्यांच्या पक्षाला योग्य जागा न दिल्यास ते एकटेच लढतील.
पशुपती पारस हे रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू
पशुपती पारस हे रामविलास पासवान यांचे धाकटे भाऊ आहेत. त्यांच्या निधनानंतर लोक जनशक्ती पक्षाला वाद आणि मतभेदाला सामोरे जावे लागले. रामविलास यांचा मुलगा चिराग पासवान आणि पशुपती पारस यांनी पक्षापासून फारकत घेतली असली तरी दोन्ही नेते रालोआ आघाडीच्या झेंड्याखाली आहेत. पशुपती पारस यांनी 2021 मध्ये एलजेपीचे अध्यक्षपद स्वीकारले आणि केंद्र सरकारमध्ये मंत्री बनले.
एनडीएत वाढलाय तणाव
बिहारच्या राजकारणात आघाडीला महत्त्वाचे स्थान आहे. राज्यात आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत भाजप आणि जदयू यांची युती झाली आहे, मात्र, पशुपती पारस यांच्या या विधानामुळे रालोआमधील नवा तणाव वाढला आहे.
भाजपचा मित्रपक्ष असूनही पारस यांची भूमिका
भाजपचा मित्रपक्ष असूनही पारस यांच्या भूमिकेवरून ते बिहारमधील भाजपच्या युतीवर खूश नसून कोणतीही तडजोड न करता निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे सूचित करते. आता पशुपती पारस यांच्या या विधानाचा बिहारमधील राजकीय समीकरणावर काय परिणाम होतो आणि भाजप बिहारमधील आपल्या मित्रपक्षांशी कसा ताळमेळ ठेवतो हे पाहायचे आहे.
हेदेखील वाचा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किती वेतन मिळणार माहितीये का? ‘हा’ आकडा एकदा पाहाच…