उच्च रक्तदाबामुळे महिलांमध्ये वाढतोय heart attack चा धोका!
शरीरात वाढलेल्या उच्च रक्तदाबामुळे हृदयाला हानी पोहचते. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर हृदयाच्या किंवा मेंदूच्या रक्तवाहिन्या फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात उच्च रक्तदाबाची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. याशिवाय उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला उच्च रक्तदाबामुळे कोणत्या आजारांची शरीराला लागण होते? यावर कोणते उपाय प्रभावी ठरतील, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
उच्च रक्तदाबाची लक्षणे काय आहेत?
उच्च रक्तदाबाची लक्षणे अनेकदा दिसत नाहीत, त्यामुळे त्याला ‘साइलेंट किलर’ म्हणतात. काही लोकांना डोकेदुखी, चक्कर येणे, धाप लागणे किंवा छातीत दुखणे यासारखी लक्षणे जाणवू शकतात.
उच्च रक्तदाब म्हणजे काय?
उच्च रक्तदाब म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताचा दाब जास्त असणे. जेव्हा हृदय रक्त पंप करते, तेव्हा ते रक्तवाहिन्यांवर दाब टाकते. हा दाब जास्त असेल, तर उच्च रक्तदाब होतो.






