संसदरत्न 2025 जाहीर महाराष्ट्रातून सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, वर्षा गायकवाड मेधा कुलकर्णी यांना पुरस्कार जाहीर (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : संसदीय कामकाजामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना संसदरत्न पुरस्कार दिला जात असतो. यंदाची संसदरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. संसद रत्न पुरस्कार 2025 साठी भर्तृहरी महताब आणि रवी किशन यांच्यासह 17 खासदार आणि दोन संसदीय स्थायी समित्यांची निवड करण्यात आली आहे. हे पुरस्कार ‘प्राइम पॉइंट फाउंडेशन’ ने सुरू केले होते. संसदरत्न पुरस्कारमध्ये महाराष्ट्रातील सात खासदारांचा समावेश आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्काराने पुन्हा एकदा सन्मानित करण्यात येणार आहे. विरोधी बाकावर बसणाऱ्या सुप्रिया सुळे या त्यांच्या संसदेमधील आक्रमक भाषण आणि मुद्देसूद मांडणीसाठी ओळखल्या जातात. जनतेची बाजू मांडून विकासकामांसाठी निधीची मागणी करणाऱ्या सुप्रिया सुळे या संसदेच्या मर्यादा पाळताना दिसतात. त्यांची संसदीय भाषणे तरुणवर्गामध्ये प्रसिद्ध आहेत. यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सदस्यांना सन्मानित करण्यासाठी, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली होती. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह महाराष्ट्रातील सात खासदारांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये सत्ताधारींसह विरोधी खासदारांचा देखील समावेश आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनाही संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना देखील संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
संसदरत्न पुरस्कारासाठी नावं जाहीर करताना विविधांगी बाबी तपासल्या जातात. यामध्ये भाषण, संसदीय कामकाज आणि चर्चेमधील सहभाग पाहिला जातो. संसदरत्न पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील अनेक महिला नेत्यांचा देखील समावेश आहे. भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांनाही संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. भाजपच्या खासदार स्मिता वाघ, भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड या तीन महाराष्ट्रातील महिला नेत्यांचा समावेश आहे. राज्यातील सात खासदारांपैकी चार महिला खासदार असल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संसदरत्न पुरस्कारासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे (एनसीबीसी) अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरी समितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली. मेहताब , एन. ऑफ. प्रेमचंद्रन (क्रांतिकारी समाजवादी पक्ष), रवी किशन (भाजप), निशिकांत दुबे (भाजप), विद्युत बरन महतो (भाजप), पी. पी. चौधरी (भाजप), मदन राठौर (भाजप), सी. एन. अण्णादुराई (द्रविड मुनेत्र कळघम) आणि दिलीप सैकिया (भाजप) या खासदारांचा देखील समावेश असणार आहे.