नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या (Rajiv Gandhi) हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या दोषींची तुरुंगातून मुक्तता करण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नलिनी श्रीहरन आणि आरपी रविचंद्रन यांच्यासह सहा दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.
[read_also content=”उत्तराखंडमध्ये पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी; हे आयुर्वेदविरोधींचे काम- बाबा रामदेव https://www.navarashtra.com/india/five-patanjali-drugs-banned-in-uttarakhand-so-this-is-the-work-of-anti-ayurveda-baba-ramdev-nrgm-343524.html”]
माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा निकाल दिला. या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सहा दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नलिनी श्रीहरन आणि आरपी रविचंद्रन यांच्यासह सहा दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश दिले. नलिनी आणि रविचंद्रन यांनी त्यांच्या मुदतपूर्व सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि बीव्ही नागरथना यांच्या खंडपीठाने यावेळई सांगितले की, या खटल्यातील दोषींपैकी एक असलेल्या एजी पेरारिवलन यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय इतर दोषींच्या बाबतीतही लागू होतो.18 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने पेरारीवलनच्या सुटकेचे आदेश दिले होते.
[read_also content=”आपला तो फेकू… दुसऱ्याचा तो पप्पू, सुषमा अंधारे यांची किरीट सोमय्यांवर खोचक टिका https://www.navarashtra.com/maharashtra/sushma-andhare-slams-bjp-former-mp-kirit-somaiya-343592.html”]
राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की 9 सप्टेंबर 2018 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी या प्रकरणातील सात दोषींच्या दयेच्या अर्जावर विचार केला आणि राज्यपालांना त्यांच्या जन्मठेपेसाठी त्यांच्या अधिकारांचा वापर करण्यास सांगितले. श्रीहरन, रविचंद्रन, संथन मुरुगन, एजी पेरारिवलन, रॉबर्ट पायस आणि जयकुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि त्यांनी 23 वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात घालवला आहे. असाही उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. श्रीहरन आणि रविचंद्रन यांनी कलम 161 अन्वये दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय घेण्यास ते सक्षम असून 9 सप्टेंबर 2018 रोजी राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय अंतिम असून राज्यपाल त्यावर विचार करू शकतात, असे राज्य सरकारने म्हटले होते.
[read_also content=”साखर संघाच्या संचालकपदी सुहासिनीदेवी घाटगे यांची बिनविरोध निवड https://www.navarashtra.com/maharashtra/suhasinidevi-ghatge-was-elected-unopposed-as-the-director-of-sugar-association-nrdm-343597.html”]
नलिनी श्रीहरन यांना वेल्लोरमधील महिलांसाठी असलेल्या विशेष तुरुंगात 30 वर्षांहून अधिक काळ ठेवण्यात आले आहे, तर रविचंद्रन हे मदुराई येथील मध्यवर्ती कारागृहात आहेत आणि 29 वर्षांच्या तुरुंगवास आणि माफीसह त्यांनी तब्बल 37 वर्षे तुरुंगात घालवले आहेत. 26 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने श्रीहरन आणि रविचंद्रन यांची मुदतपूर्व सुटका करण्याच्या याचिकेवर केंद्र आणि तामिळनाडू सरकारकडे उत्तर मागितले होते. दोघांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या 17 जूनच्या आदेशाला आव्हान दिले होते. मात्र, त्यांच्या सुटकेची याचिका न्यायालयानं फेटाळून लावली होती. यावेळी त्यांनी सह-दोषी पेरारिवलनच्या सुटकेच्या आदेशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला दिला होता.