मध्यप्रदेशमध्ये शाळेच्या बसला अपघात (फोटो- istockphoto )
मध्यप्रदेशमध्ये बुराणपुर जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे. बुराणपुर जिल्ह्यातील नेपानगर येथे शाळेच्या बसला अपघात झाला आहे. वेगाने येणारी शाळेची बस ही नदी किनारी पलटली आहे. या अपघातामध्ये 20 विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही दुर्घटना सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान घडली आहे. याबद्दल नेपानगरच्या पोलिसांनी माहिती दिली आहे. वेगाने येणारी बसचे नियंत्रण सुटले आणि ती उलटली. यामध्ये 20 विद्यार्थी जखमी झाले.
At least 20 students injured as school bus overturns at Nepanagar in Madhya Pradesh: police
— Press Trust of India (@PTI_News) February 19, 2025
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, शाळेच्या बसला अपघात झाला. नदीकिनारी शाळेची बस उलटली. यामध्ये 20 विद्यार्थी जखमी झाले. यामध्ये चार विद्यार्थ्यांच्या पायाचे हाड तुटले. काही जणांच्या डोक्याला दुखापत देखील झाली. जखमी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. बसचा वेग अधिक होता. काही विद्यार्थ्यांनी चालकाला बसचा वेग कमी करण्यासंदर्भात सांगितले होते. मात्र चालकाने ऐकले नाही अशी माहिती समोर येत आहे.
ही दुर्घटना मध्यप्रदेशची राजधानी भोपाळपासून 300 किमी अंतरावर घडली आहे. ही बस नेपानगरमधील एक शाळेकडे विद्यार्थ्यांना घेऊन चालली होती. पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने बस चलवणाऱ्य चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुर्घटना घडल्यानंतर चालक त्या ठिकाणावरून फरार झाला आहे. पोलिस तयाचा शोध घेत आहेत.
महाकुंभला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. लाखों भाविक त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी येत आहेत. दरम्यान प्रयागराजमध्ये एक भीषण अपघात घडली आहे. बोलेरो गाडी आणि बसची धडक झाली आहे. या भीषण अपघातामध्ये 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. टर 19 प्रवाशी जखमी झाले आहेत. मृत्यूमुखी पडलेले सर्व प्रवासी बोलेरोमधून प्रवास करत होते.
प्रयागराज- मिर्झापुर हायवेवर बोलेरो आणि बसचा भीषण अपघात झाला. छत्तीसगडमधील भाविक महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी प्रयागराजच्या दिशेने चालले होते. मात्र काळाने त्यांच्यावर महाकुंभला जाण्याआधीच घाला घातला आहे. यामध्ये 19 प्रवासी जखमी झाले आहेत. हे 19 प्रवासी बसमधून प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी मध्यप्रदेशमधील राजगड जिल्ह्यात राहणारे प्रवासी होते.
समृद्धी महामार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू, पाचजण गंभीर जखमी
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे. या महामार्गावर सिन्नरजवळ एक भीषण अपघात झाला. इनोव्हा कारचा ताबा सुटल्याने ती साईड अँगलला धडकली. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कारमधील प्रवासी रत्नागिरी येथील असून, ते प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला आणि देवदर्शनासाठी गेले होते. समृद्धी महामार्गाने परतत असताना त्यांना हा दुर्दैवी अपघात झाला.