जयपूर : राजस्थानमध्ये (Rajasthan) उन्हाळ्याच्या सुट्या संपल्यानंतर पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या आहेत. पण शिक्षण विभागाने जारी केलेल्या निर्देशानुसार, राजस्थानमध्ये यावेळी १२५ दिवस सुट्ट्या असतील. एवढेच नाही तर यावेळी राजस्थानमधील सरकारी शाळांमध्ये तीन नवीन अभ्यासक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये गुड टच (Good Touch) आणि बॅड टच (Bad Touch) या विषयांचाही समावेश आहे. यावेळी राजस्थानमध्ये केवळ 240 दिवसांची शाळा होणार आहे. वर्षभरात विविध सणांना 53 रविवार आणि सुट्ट्या असणार.
इतकंच नाही तर राजस्थानच्या सरकारी शाळांमध्ये यावेळी एक नवा प्रयोग होणार आहे. राजस्थानमधील सरकारी शाळांमध्ये आता मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी त्यांना ४५ दिवस राणी लक्ष्मीबाई स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर देण्यात येणार आहे. जे ऑक्टोबर ते ऑगस्ट दरम्यान होणार आहे. यावेळी शाळेत एक दिवस नो बॅग डे आयोजित करण्याचा शासनाचा मानस आहे. यासोबतच अभ्यासाबरोबरच इतर कौशल्येही मुलांना शिकवण्यात येणार आहे.
राजस्थानमधे सर्वप्रथम जुलै महिन्यात २९ जुलैला मोहरमनिमित्ता सुट्टी असेल आणि चौथ्या आठवड्यात दोन दिवस शैक्षणिक भाषण होईल. तर ऑगस्टमध्ये 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन आणि 30 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या सणासाठी सुट्टी असेल. पहिल्या परीक्षेमुळे 23 ते 25 पर्यंत सुटी असू शकते. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त शाळांमध्ये अनेक कार्यक्रम होत असल्याने या दिवशी सुट्टीही असू शकते. 7 सप्टेंबरला कृष्ण जन्माष्टमी आणि 25 सप्टेंबरला रामदेव जयंती आणि तेज दशमी. दुसरीकडे, 28 सप्टेंबर रोजी बारावाफत सुट्टीचा प्रस्ताव आहे. 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शैक्षणिक परिषदेमुळे ऑक्टोबर महिन्यात पुन्हा एकदा शाळांच्या वेळा बदलण्यात येणार आहेत. दुसरीकडे, 15 ऑक्टोबरला नवरात्री स्थानपना, 22 ऑक्टोबरला दुर्गा अष्टमी आणि 24 ऑक्टोबरला विजयादशमी असल्यामुळे सुट्टी असेल.