महाराष्ट्राचे माजी राज्यपाल तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के शंकरनारायणन यांचे आज रविवारी केरळमधील पलक्कड येथील राहत्या घरी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.
शंकरनारायणन हे महाराष्ट्र, नागालँड आणि झारखंडचे राज्यपाल होते. तसेच त्यांनी अरुणाचल प्रदेश, आसाम आणि गोवा या राज्यांचे काही काळ राज्यपाल म्हणून काम पाहिले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले शंकरनारायणन हे चार वेळेस आमदार होते. तसेच त्यांनी केरळचे अर्थ, अबकारी आणि कृषीमंत्री म्हणून त्यांनी काम केले होते.
[read_also content=”पोटच्या बाळाची केली आईने हत्या; सातारा जिल्ह्यातील घटना https://www.navarashtra.com/maharashtra/kellys-mother-kills-unborn-baby-incidents-in-satara-district-nrdm-272810.html”]
दरम्यान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करुन महाराष्ट्राचे माजी राज्यपाल के शंकरनारायणन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये आम्हाला ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा महाराष्ट्राचे माजी राज्यपाल के शंकरनारायणन यांच्या निधनाचे दुःख होत आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो !