File Photo : Crime
गोरखपूर : गोरखपूरमध्ये दोन मुलांची आई प्रेमाच्या रंगात इतकी बुडाली होती की, भूत काढण्याच्या नावाखाली तिच्या घरी आलेल्या एका तांत्रिकाच्या प्रेमाच्या जाळ्यात ती अडकली. यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सुनेवर कारवाई करण्याची मागणी सासूने केली आहे. या महिलेचा नवरा परदेशात राहतो.
गोरखपूरच्या गुलरिया पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावातील हा प्रकार आहे. एका महिलेने पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. यामध्ये माझ्या सुनेला परत आणा. लग्नानंतर काही दिवसांतच सून घरात गोंधळ घालायची आणि विनाकारण इकडे तिकडे वस्तू फेकायची. ती शांत झाल्यावर भूतबाधा झाल्याबद्दल बोलायची. यासंदर्भात एका तांत्रिकाशी संपर्क साधला असता त्याने घरी येऊन उपचार केले.
हळूहळू दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू झाले. पण आम्ही सून आणि तांत्रिक यांच्यावर कधीच संशय घेतला नाही. सासूने पुढे सांगितले की, शनिवारी सून आणि दोन्ही नातवंडे एका नातेवाईकाच्या घरी मांगलिक कार्यक्रमाला गेले होते. तेव्हा नातेवाईकाचा फोन आला की, तुमची सून तांत्रिकासह फरार झाली आहे.