२० वर्षांच्या तुनिषाने गळफास घेऊन आत्महत्या केली. टीव्ही जगतातल्या अवकाशातून तुनिषा नावाचा नुकताच चमकू लागणारा तारा कायमचा निखळला. शिझान खानच्या मेक अप रूममध्ये तुनिषाने गळफास घेत आत्महत्या केली.
दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २४ डिसेबंरला अलीबाबा या मालिकेच्या सेटवर सगळं काही नॉर्मल होतं. रोजच्या प्रमाणेच त्या दिवशीही शुटिंग सुरू होतं. याच दिवशी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास शिझान खानच्या मेकअप रूममध्ये तुनिशा फास लागलेल्या अवस्थेत सापडली. शिझानने मेकअप रूमचा दरवाजा ठोठावला. तुनिशाला हाकाही मारल्या.. शेवटी तुनिषा दार उघडत नाही म्हटल्यावर ते तोडण्यात आलं. तुनिशा गळफास लावलेल्या अवस्थेत होती. तिला खाली उतरवून रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली.
तुनिषा शर्मा प्रेगनंट असल्याच्या बातम्या तिच्या मृत्यूनंतर पसरल्या होत्या. मात्र पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रूग्णालयात पाठवला होता. या रूग्णालयाने दिलेल्या अहवालानुसार जेव्हा तिचा मृत्यू झाला तेव्हा ती गरोदर नव्हती हे समोर आलं. फास लागून श्वास कोंडल्याने तुनिषाचा मृत्यू झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे ती गरोदर असल्याच्या आणि तिची हत्या झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
२४ डिसेंबरला तुनिशा शर्मा सकाळी अत्यंत आनंदात सेटवर गेली होती. शिझान आणि तुनिषा या दोघांनी दुपारी ३ वाजता सोबत जेवणही केलं. त्यानंतर सव्वा तीन वाजता तुनिषा शर्माचा मृतदेह गळफास लागलेल्या अवस्थेत सापडला. ३ वाजेपर्यंत जी मुलगी नॉर्मल होती तिने सव्वा तीन वाजता इतकं टोकाचं पाऊल कसं काय उचललं? त्यामागे काय कारण आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
तुनिषा आणि शिझान या दोघांचं ब्रेक अप १५ दिवसांपूर्वीच झालं होतं. तुनिषाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार हे दोघंही मागच्या सहा महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. मात्र तुनिषाने चुकून एकदा शिझानचे चॅट वाचले. त्यावेळी शिझान आपल्याला फसवतोय हे तिच्या लक्षात आलं. याचा परिणाम या दोघांचं ब्रेक अप होण्यात झाला. ब्रेक अप झाल्यानंतर तुनिषा खूपच तणावात होती असंही तिच्या आईने पोलिसांना सांगितलं. तुनिषाने आईला हेदेखील सांगितलं होतं की जरी माझं शिझानसोबत ब्रेक अप झालं असेल तरीही मला तो माझ्या आयुष्यात हवा आहे. त्यानंतर तुनिषाच्या आईने शिझानच्या कुटुंबासोबतही चर्चा केली होती. शिझानने माझ्या मुलीच्या आयुष्यात परतावं अशी विनंतीही आपण केल्याचं तिच्या आईने सांगितलं मात्र शिझानच्या कुटुंबाने त्यांचं ऐकलं नाही.
दुसरीकडे, या प्रकरणाच्या तळाशी जाऊन तुनिषाच्या मृत्यू प्रकरणातील पुरावे गोळा करण्याच्या उद्देशाने, पोलीस आणि फॉरेन्सिक तज्ञांनी नया गावातील मदर नेचर स्टुडिओ आणि विशेषत: त्याच्या मेकअप रूमची बारकाईने तपासणी केली, जिथे तुनिषाने गळफास लावून घेतला. .करून जीव दिला. पोलिसांनी घटनास्थळावरून क्रेपची पट्टीही जप्त केली, ज्यावरून तुनिषाने गळफास लावून आत्महत्या केली होती.
याशिवाय फॉरेन्सिक तज्ज्ञांनी ट्यूनीशाचे कपडे, तिचे दागिने आणि स्टुडिओत असलेल्या तिच्या इतर गोष्टीही जप्त केल्या. तसेच तुनिषाच्या आत्महत्येवेळी तिने घातलेले शीजनचे कपडेही पोलिसांनी जप्त केले आहेत. आता त्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे.
पोलिसांना शीजान आणि तुनिषाच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी करायची आहे, जेणेकरून त्यांच्या चॅट्सवरून किंवा मोबाईलमध्ये असलेल्या इतर गोष्टींवरून कळू शकेल, दोघांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी काय चालले होते. विशेषत: शीजानच्या आयुष्यात तुनिशाशिवाय इतर मुली होत्या का, ज्यावरून तुनिशा आणि शीजानमध्ये वाद झाला होता? तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी शीजानवर असाच आरोप केला आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनीही या प्रकरणाच्या तळाशी जाणे गरजेचे आहे.