नवी दिल्ली – प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या टीकेमुळे आता या प्रकरणात दहशतवादी संघटना अल कायदानेही उडी घेतली आहे. अल कायदा इन द सबकॉन्टिनेंट (AQIS) ने भारताला धमकी देणारे पत्र जारी केले आहे. या पत्रात दिल्ली, मुंबई, यूपी आणि गुजरातमध्ये आत्मघातकी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रावरील तारीख ६ जून २०२२ आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
भगव्यावाद्यांना संपवणार
अल कायदाने पत्रात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी हिंदुत्वाच्या प्रचारकाने टीवी चर्चेदरम्यान इस्लामचा अपमान केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे जगभरातील मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आम्ही पैगंबरांच्या अपमानाचा बदला घेऊ, असेही अल कायदाने पुढे म्हटले आहे. दिल्ली, मुंबई, यूपी आणि गुजरातमधील भगव्या कार्यकर्त्यांना संपवणार. तो त्याच्या घरात लपून राहू शकणार नाही किंवा सैन्य त्याला वाचवू शकणार नाही.
नुपूर शर्मा यांनी पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती
एका बातमीच्या चर्चेत भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, ज्याचा मुस्लिम समुदाय सातत्याने विरोध करत आहे. नुकतेच शर्मा यांनी एक निवेदन जारी करून त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. या प्रकरणाने पेट घेतल्यानंतर पक्षाने तिला निलंबित केले, त्यानंतर तिने आपले विधान बिनशर्त मागे घेत असल्याचे सांगितले. शर्मा यांच्यावर महाराष्ट्रासह अनेक राज्यांत गुन्हेही दाखल आहेत.






