भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी जम्मू- काश्मीरमध्ये (Jammu And Kashmir) एक मोठी कामगिरी केली आहे. घुसखोरी करु पाहणाऱ्या दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा डाव उधळून लावत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (LoC) या दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातलं. जम्मू काश्मीर पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली.
[read_also content=”अब्दुल सत्तारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या! आधी टीईटी प्रकरण आणि आता… https://www.navarashtra.com/maharashtra/abdul-sattar-has-been-ordered-in-the-election-affidavit-issue-nrps-319504.html”]
सैन्य दलाचे जवान आणि बारामुल्ला पोलिसांनी संयुक्त पणे ही कारवाई करत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमधील कमलकोट परिसरात मदियान नानक चौकी येथे सैन्य दलाने ही कारवाई केली आहे. काश्मीर झोनच्या पोलिसांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती देत सांगितलं आहे, ‘उरीच्या कमलकोट सेक्टरमधील मादियान नानक चौकीजवळ लष्कर आणि बारामुल्ला पोलिसांनी घुसखोरी करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. यापूर्वी अखनूर सेक्टरमध्ये लष्कराने दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता.’
[read_also content=”उद्योजक अनिल अंबानींना इन्कम टॅक्सची नोटीस, 420 कोटी रुपयांचा कर चुकवल्याचा ठपका https://www.navarashtra.com/latest-news/income-tax-notice-to-anil-ambani-in-case-of-tax-evasion-of-rs-420-crore-nrps-319464.html”][blurb content=””]