नवी दिल्ली : बुद्धीजीवीसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सोशल मीडियावरील सर्वात प्रभावी माध्यम म्हणून ट्विटरकडे पाहिले जाते. मोजक्या शब्दात आपले म्हणणे मांडणे ही एक कला आहे. आणि ही कला ट्विटरवर मोठे मोठे नेते, सेलिब्रेटी आदीजण मांडत असतात. पण ही शब्दमर्यादा आता वाढणार आहे. त्यामुळं युजर्सना अधिक टिवटिव करता येणार आहे. एका युजर्सने 280 शब्दांची त्रासदायक मर्यादा आहे, ही शब्दमर्यादा 420 पर्यंत केली पाहीजे, असं एलन मस्कना टॅग करुन विचारले. यावर मस्क यांनी उत्तर देताना ‘चांगली कल्पना’ आहे, असा रिप्लाय दिला. त्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, ट्विटरने केवळ 140 वर्णांच्या मर्यादांना परवानगी दिली होती. यानंतर, 2018 मध्ये 140 वरून 280 शब्दमर्यादा करण्यात आली.
दरम्यान, ट्विटरचा पदभार स्वीकारल्यापासून एलन मस्क यांनी कंपनीत मोठे फेरबदल केले आहेत. तसेच अनेक कामचुकार कर्मचाऱ्यांना त्यांनी नारळ दिला आहे. कर्मचारी कपातीत त्यांनी 50% पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. त्यांनी $8 साठी ब्लू सबस्क्रिप्शन सेवा देखील सुरू केली. मस्कने ट्विटमध्ये लिहिले की, ‘ट्विटर लवकरच लांबलचक मजकूर जोडण्यासाठी एक नवीन फीचर जोडणार आहे, ज्यामुळे नोटपॅड स्क्रीनशॉटचा वापर दूर होईल. ते म्हणाले. तसेच आगामी काळात त्यांनी ट्विटरवर लाँग व्हिडीओसारख्या अनेक सेवांची घोषणा केली आहे.