अमेरिकेत खामेनी विरोधी निदर्शनांवर एका ट्रकने हल्ला केला, अनेक लोकांना चिरडले; एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Los Angeles Iran protest truck attack 2026 : इराणमध्ये (Iran) सुरू असलेल्या क्रांतीची धग आता सातासमुद्रापार अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे. लॉस एंजेलिसमधील वेस्टवुड परिसरात रविवारी एका भीषण घटनेने खळबळ उडाली. इराणमधील स्वातंत्र्याच्या मागणीसाठी जमलेल्या शेकडो आंदोलकांच्या गर्दीत एका यू-हॉल (U-Haul) ट्रकने शिरकाव केला. या हल्ल्यात अनेक जण चिरडले गेल्याची भीती व्यक्त केली जात होती, मात्र सुदैवाने तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अमेरिकेतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
शेकडो इराणी-अमेरिकन नागरिक हातात राष्ट्रध्वज घेऊन इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. अचानक एक भरधाव ट्रक गर्दीच्या दिशेने आला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, ड्रायव्हरने मुद्दाम आंदोलकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. या ट्रकवर एक बॅनर होता ज्यावर “मुल्ला नकोत, १९५३ ची पुनरावृत्ती नको” असा राजकीय संदेश लिहिला होता. ट्रक धडकल्यानंतर संतप्त जमावाने ट्रकला घेराव घातला, खिडक्या फोडल्या आणि ड्रायव्हरला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून चालकाला ताब्यात घेतले, अन्यथा जमावाकडून त्याची मॉब लिंचिंग होण्याची शक्यता होती.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: तिसऱ्या महायुद्धाचा काउंटडाउन! अमेरिकेपासून भारतापर्यंत 10 देश युद्धाच्या उंबरठ्यावर; जनताजनार्दन सोसणार झळ
या घटनेनंतर काही वेळातच नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली. इराण सरकारने आंदोलकांचा आवाज दाबण्यासाठी संपूर्ण देशात इंटरनेट बंद केले आहे. यावर तोडगा म्हणून ट्रम्प यांनी अब्जाधीश एलन मस्क यांच्याशी चर्चा करण्याचे ठरवले आहे. ट्रम्प म्हणाले, “आम्ही एलन मस्क यांच्या स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेटचा वापर करून इराणमधील जनतेला जगाशी जोडू शकतो. हुकूमशाही राजवट आता लोकांचा आवाज दाबू शकणार नाही.” जर मस्क यांनी ‘स्टारलिंक’ इराणमध्ये सक्रिय केले, तर खामेनी सरकारला निदर्शने चिरडणे अशक्य होईल.
WATCH 🔴 An enraged crowd dragged the truck driver from his cab and destroyed the vehicle after it plowed into Iranian demonstrators in Los Angeles, California. pic.twitter.com/1CPyr0sY1p — Open Source Intel (@Osint613) January 12, 2026
credit : social media and Twitter
मानवाधिकार संघटनांच्या अहवालानुसार, गेल्या दोन आठवड्यांत इराणमध्ये ५३० हून अधिक आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. इराण सरकारने केवळ इंटरनेटच बंद केले नाही, तर आंदोलकांवर थेट गोळीबार करण्याचे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये झालेला हा ट्रक हल्ला इराणमधील अंतर्गत संघर्षाचे पडसाद जगभरात उमटत असल्याचे प्रतीक आहे. लॉस एंजेलिस पोलिसांनी याला ‘हेट क्राईम’ (Hate Crime) मानून तपास सुरू केला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran US Conflict : इराणची ‘डेथ वॉरंट’ घोषणा; अमेरिका आणि इस्रायल ‘हिट लिस्ट’वर; मध्यपूर्वेत युद्धजन्य हालचालींना वेग
इराणमधील निदर्शनांना संघटित करण्यासाठी इंटरनेट हे सर्वात मोठे शस्त्र आहे. एलन मस्क यांची ‘स्टारलिंक’ सेवा कोणत्याही स्थानिक केबल किंवा टॉवरवर अवलंबून नसते. थेट अंतराळातून येणाऱ्या सिग्नलमुळे इराण सरकारला हे इंटरनेट ब्लॉक करणे कठीण जाईल. ट्रम्प आणि मस्क यांची ही ‘डिजिटल स्ट्राईक’ इराणमधील धार्मिक राजवट उलथवून टाकण्यासाठी गेमचेंजर ठरू शकते.
Ans: एका ट्रक चालकाने मुद्दाम इराण सरकारचा निषेध करणाऱ्या आंदोलकांच्या गर्दीत ट्रक घुसवला, ज्यामध्ये ३ जण जखमी झाले आहेत.
Ans: इराण सरकारने देशात इंटरनेट बंद केले आहे. एलन मस्क यांच्या 'स्टारलिंक' द्वारे सॅटेलाइट इंटरनेट पुरवून आंदोलकांना मदत करण्याचा ट्रम्प यांचा विचार आहे.
Ans: ट्रकवर असलेल्या राजकीय बॅनरवरून असे दिसून येते की, हा हल्ला वैयक्तिक किंवा राजकीय द्वेषातून केला गेला असावा. पोलीस सध्या याचा तपास करत आहेत.






