कंटेनर कारवर पडल्याने कारचा चक्काचूर (फोटो सौजन्य-X)
कर्नाटकात शनिवारी (21 डिसेंबर) दोन वेगवेगळ्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. पहिला अपघात बेंगळुरूमध्ये घडला, जिथे कंटेनर ट्रक पलटी होऊन कारला धडकला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. दुसरा अपघात मंड्या येथे ट्रकने कारला धडक दिली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.
बेंगळुरू पोलिसांनी सांगितले की, शनिवारी नेलमंगला येथे कंटेनर ट्रक एका कारवर उलटल्याने सहा जण ठार झाले. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना बेंगळुरूच्या बाहेरील तळकेरेजवळ घडली. मोठा मालवाहू कंटेनर सहा जणांना घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्ग 48 वरील वाहन वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.
कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात शनिवारी ट्रकने कारला धडक दिल्याने तीन जण ठार झाले, तर दुसरा गंभीर जखमी झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही घटना मद्दूर तालुक्यात सकाळी अकराच्या सुमारास घडली. येथे ट्रकने कारला धडक दिली. गाडीत चार जण होते. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला, तर आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला बेंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी ट्रक चालकावर भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 281 (सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवणे) आणि 106 (निष्काळजीपणामुळे मृत्यू) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
तळकीरे येथे कंटेनर ट्रक पलटी होऊन कारवर पडल्याने कारचा चक्काचूर झाला. या अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या सहा जणांचा मृत्यू झाला. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्ग 48 वरील वाहतूक विस्कळीत झाली.
यावेळी सांगलीमधील जत तालुक्यातील मोरबगी गावातील लोक बेंगळूरुला कामाला आहेत. नाताळच्या सुट्टीनिमित्त बेंगळुरूवरून आपल्या गावी परतत असताना हा भीषण अपघात झाला. कारमध्ये ६ जण होते ते जतमधील आपल्या गावाकडे येत होते. मात्र गावी पोहोचण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. तळकेरे येथे आल्यानंतर समोरून येणारा कंटेनर ट्रक कारवर पलटी झाली. या घटनेत कारमधील सर्व जणांचा मृत्यू झाला. सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे.
यामध्ये चंद्रम इगाप्पागोळ (४६), त्यांची पत्नी धोराबाई इगाप्पागोळ (४०), मुलगा गण इगाप्पागोळ (१६), मुळी दीक्षा (१०), आर्या (६), चंद्रम इगाप्पागोळ यांची मेहुणी विजयालक्ष्मी (३५) यांचा समावेश आहे. चंद्रम इगाप्पागोळ हा मूळचा सांगलीचा रहिवासी असून तो तालुक्यातील मोराबगी गावचा रहिवासी आहे. तो बंगळुरू येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला होते. इगाप्पागोळ कुटुंब वीकेंडच्या सुट्टीमुळे KA-01-ND-१५३६ क्रमांकाच्या SUV मधून सांगलीच्या दिशेने निघाले होते. कंटेनर ट्रकच्या समांतर जात असताना कंटेनर उलटला. कार कंटेनरखाली अडकून पार चक्काचूर झाला.
चंद्रागप्पा इगाप्पागोळ यांनी बेंगळूरूमध्ये IAST सॉफ्टवेअर सोल्युशन्स कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीत सुमारे ३०० लोक काम करत होते. इगाप्पागोळ यांनी दोन महिन्यांपूर्वी एक लक्झरी व्होल्वो कार (KA 01 ND 1536) खरेदी केली होती. ही एक उच्च श्रेणीची कार असून ज्याची किंमत सुमारे १ कोटी रुपये आहे. वीकेंड ट्रिपला जात असताना ही दुर्घटना घडली.