मुंबई : गँगस्टर छोटा राजनला (Chhota Rajan) संपवण्यासाठी अंलडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिमनं (Dawood Ibrahim) 23 वर्षांपूर्वी सुपारी दिली होती, हे आता समोर आलंय. मुन्ना झिंगाडा याला ही सुपारी देण्यात आली होती. झिंगाडानं सप्टेंबर 2000 साली बँकॉकच्या एका फ्लॅटमध्ये अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यात छोटा राजन गंभीर जखमी झाला होता. इथपर्यंतची कहाणी सगळ्यांना माहितीये. मात्र, या प्रकरणात आता नवी माहिती समोर आलीय. राजनची हत्या करण्याची सुपारी देण्यात आलेल्या मुन्ना झिंगडा यालाही मारण्याची सुपारी त्याच दिवशी दाउदनं दिली होती, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. मुंबईच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानंच हा गौप्यस्फोट केल्याचं सांगण्यात येतंय.
दाऊदनं छोटा राजनची हत्या केली, हे कधीच उघड होऊ नये यासाठी ही योजना तयार करण्यात आली होती. मुन्ना झिंगडानं छोटा राजनचा बळी त्या दिवशी घएतला असता, तर दाऊदच्या एका पंटरनं त्याच दिवशी मुन्नालाही संपवलं असतं. मात्र, गोळीबार झाला त्यावेळी बँकॉक पोलिसांनी तातडीनं झिंडाडाला अटक केली. त्यामुळं त्याच्या मर्डरचा प्लॅन फसला.
झिंगाडा पुन्हा कसा आला चर्चेत
2019 साली मुन्ना झिंगाडा हा बँकॉकमधून पाकिस्तानात शिफ्ट झाला होता. त्यावेळी दाऊद त्याला मारणार असल्याच्या कटाचा सुगावा त्याला लागला होता. तेव्हापासून तो दाऊद आणि शकीलपासून दूर राहत होता. 2021 साली त्याच्यावर पाकिस्तानात हल्ला झाल्याचीही माहिती आहे. मंगळवारी झिंगाडाच्या आत्येचं निधन झालंय. त्यानंतर मुंबई पोलीस झिंगाडानं मुंबईत कुणाला फोन केला होता का, याचा शोध घेत आहेत. झिंगाडाचं बालपण याच आत्याकडे गेलं होतं.
दाऊदचा गेम समजून घ्या…
छोटा राजनवर हल्ला करण्यासाठी शरद शेट्टी आणि छोटा शकील यांनी प्लॅनिंग केलं होतं. मुन्ना हा छओटा शकीलचा शूटर होता. आयएसआयनं डी कंपनीच्या या कटासाठी फायनान्स दिला होता. शूटआऊटसाठी झिंगाडासह थायलंडच्या स्थआनिक गुंडांची मदत घेण्यात आली होती. काही पाकिस्तानी शूटर्सही बँकॉकला पाठवण्यात आले होते. त्यांनाच राजनच्या हत्येनंतर झिंगाडा यालाही गोळ्या झाडून ठार करण्याचे आदेश देण्यात आले होते.
मात्र, झिंगाडाला बँकांकमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर अनेक वर्ष झिंगाडा जेलमध्ये होता. त्याची सुटका होत असताना त्याला भारतात आणण्यासाठी केंद्राकडून पुरावे देण्यात आले. त्याचं शाळेचं सर्टिफिकेट दाखवण्यात आलं. तर पाकिस्ताननं त्याचं आणि त्याच्या पत्नीचा खोटा पासपोर्ट सादर केला. त्याच्या दोन्ही मुलांची खोटी कागदपत्रंही सादर करण्यात आली. तिथल्या कनिष्ठ न्यायालयानं भारताच्या बाजूनं निकाल दिला. त्यानंतर पाकिस्तानकडून वरिष्ठ कोर्टात अपील करण्यात आलं. त्यात निर्णय पाकिस्तानच्या बाडूनं लागला.
मुन्ना हा मुजक्किर मुदस्स्र हुसैन असल्याचं भारताचं म्हणणं होतं. तर तो मोहम्मद सलीम असल्याचा दावा पाकिस्ताननं केला होता.