उत्तर प्रदेश बाराबंकी मंदिरात चेंगराचेंगरी दर्शन रांगेत विजेचा शॉक लागल्याने दोन जणांचा मृत्यू झाला (फोटो - सोशल मीडिया)
Barabanki Mandir Stampede : उत्तर प्रदेश : आज (दि.28) श्रावणातील पहिला सोमवार आहे. यामुळे मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील मनसा देवी मंदिरात देखील काल चेंगराचेंगरीची घटना घडली होती. यामध्ये अनेक भाविकांनी जीव गमावल्यानंतर आता आज देखील मंदिरामध्ये चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात श्रावण महिन्याच्या सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली. ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. तर, ४० हून अधिक लोक जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
श्रावणी सोमवारनिमित्ताने शंकराच्या आणि इतर सर्वच मंदिरांमध्ये मोठी गर्दी जमा झाली आहे. श्रावणातील दर्शनासाठी मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी आले आहेत. या दरम्यान एक मोठा अपघात झाला. खरंतर, विजेचा तार तुटला आणि भाविकांच्या रांगेत पडला. यामुळे टीन शेडमध्ये विद्युत प्रवाह वाहू लागला. विजेचा धक्का बसल्याने चेंगराचेंगरीची घटना झाली आहे. या चेंगराचेंगरीत दोघांचा मृत्यू झाला आहे, तर ४० हून अधिक शिवभक्त जखमी झाले आहेत. त्यांना ताबडतोब बाराबंकी जिल्ह्यातील त्रिवेदीगंज सीएचसीमध्ये आणण्यात आले, त्यापैकी दोन भाविकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
चेंगराचेंगरीवर बाराबंकी डीएम काय म्हणाले?
मंदिरामध्ये दुर्घटना झाल्यानंतर प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा पूर्ण प्रयत्न प्रशासन आणि पोलीस अधिकारी करत आहेत. घटनेची माहिती देताना डीएम म्हणाले की, माकडांनी तोडलेल्या जुन्या विजेच्या तारेमुळे टिन शेडमध्ये भेगा पडल्या आणि भाविक त्यात अडकले. जिल्हा दंडाधिकारी शशांक त्रिपाठी यांच्या मते, जखमींना उपचारासाठी सीएचसी हैदरगड आणि त्रिवेदीगंज येथे पाठवण्यात आले आहे.
बाराबंकी येथील एका व्यक्तीचा हरिद्वारमध्ये मृत्यू
काल म्हणजेच रविवारी हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत बाराबंकी येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले आहेत. या घटनेत ठार झालेल्या व्यक्तीचे नाव वकील प्रसाद वर्मा असे आहे, तो बाराबंकीतील मौलाबाद येथील रहिवासी आहे. जखमींमध्ये धुरमाळ गावातील दुर्गावती, राधिका आणि फुलमती यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मनसा देवी मंदिरात ८ जणांचा मृत्यू
गेल्या रविवारी हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात विजेचा धक्का बसल्याच्या अफवेमुळे चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये ८ भाविकांचा मृत्यू झाला होता. त्याच वेळी, अनेक लोक गंभीर जखमी झाले. सावननिमित्त मंदिरात भाविकांची गर्दी जमली होती. दरम्यान, विजेचा धक्का बसल्याची अफवा पसरली आणि त्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी लोक एकमेकांवर चढू लागले.