ट्रम्प यांच्या दौऱ्याची तयारी की टॅरिफ सवलत? काय आहे वेंस यांच्या भारत भेटीमागचा उद्देश? वाचा सविस्तर
जगात सध्या एकाच वैक्तीची चर्चा आहे, ते म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी अनेक वादग्रस्त निर्णय घेतले. दरम्यान टॅरिफ वॉर, स्थलांतरांच्या बाबतीत घेतलेले निर्णय, या सर्व वातावरणात सध्या अमेरिकेचे उउपाध्यक्ष जेडी वेंस सध्या भारत भेटीवर असून त्यांनी आज सायंकाळी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब त्यांच्या निवास्थानी भेट घेतली. या भेटीला अनेक अर्थांनी महत्त्वाचं मानलं जात आहे.
दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात वेंस कुटुंबाचं पारंपरिक स्वागत झालं. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेंस यांनी आपल्या पत्नी उषा वेंस आणि मुले इव्हान, विवेक आणि मीराबेल यांच्यासह भारताच्या पहिल्या अधिकृत दौऱ्याची सुरुवात स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराच्या दर्शनाने केली. अक्षरधाम मंदिर व हस्तकला वस्तूंच्या शोरूम भेटीने. वेंस कुटुंबाने अक्षरधाम मंदिरात पूजा केली आणि जागतिक शांततेसाठी प्रार्थना केली. त्यांनी भारतीय परंपरा आत्मसात केली.मुलांनी भारतीय पारंपरिक पोशाख परिधान केला होता – इव्हान आणि विवेक यांनी कुर्ता-पायजामा घातला होता, तर मीराबेलने अनारकली ड्रेस परिधान केला होता.
भारत दौऱ्याचं उद्दिष्ट काय? वेंस यांचा दौरा हा वैयक्तिक आणि राजनैतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. ते कुटुंबासह आले आहेत आणि ताजमहाल तसेच जयपूरमध्ये होणाऱ्या एका लग्नसमारंभातही सहभागी होणार आहेत. पण मुख्य भर राजनैतिक वाटाघाटींवर असणार आहे.
1. अमेरिकन टॅरिफपासून सवलत मिळवण्यासाठी व्यापार करार
2. भारत-अमेरिका संरक्षण भागीदारी मजबूत करणे
3. द्विपक्षीय अजेंड्याचा आढावा घेणे
अमेरिकेने अलीकडे भारतासह अनेक देशांवर टॅरिफ वाढवण्याची घोषणा केली होती, मात्र सध्या 90 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे.
भारताला अपेक्षा आहे की या कालावधीत व्यापार करार होईल आणि भारतीय निर्यातदारांवरील कराचा भार कमी होईल.
भारताने संकेत दिले आहेत की तो अमेरिकन आयातांवरील टॅरिफ कमी करण्यास तयार आहे, जेणेकरून द्विपक्षीय व्यापार अधिक दृढ होईल.
संरक्षण सहकार्य देखील महत्त्वाचे आहे दोन्ही देशांमध्ये नवीन संरक्षण भागीदारी फ्रेमवर्कवर या वर्षात सह्या होण्याची शक्यता आहे.यामध्ये जैवलिन अँटी-टँक क्षेपणास्त्रे आणि स्ट्रायकर इन्फंट्री फायटिंग व्हेइकल्स सारख्या आधुनिक शस्त्रास्त्रांची खरेदी व सह-निर्मितीचा समावेश असू शकतो. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथही लवकरच भारत भेटीवर येऊ शकतात.
BJP President: भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत नवा ट्विस्ट; दक्षिण भारतातून नव्या नावाची चर्चा
ट्रंप यांच्या संभाव्य भारत दौऱ्याचा मार्ग मोकळा करत आहे वेंस यांचा दौरा वेंस यांचा हा दौरा ट्रंप यांच्या वर्षाअखेर संभाव्य भारत दौर्यासाठीची तयारी म्हणून पाहिला जात आहे. त्या वेळी क्वाड देशांच्या (भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया) शिखर परिषदेला देखील आकार मिळू शकतो. दरम्यान “अमेरिका-चीन तणाव वाढत असताना वेंस यांचा भारत दौरा भारतासाठी एक राजकीय संधी असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.