उत्तर प्रदेशमधील अयोध्येमध्ये दीपोत्सवानंतर तेल गोळा करण्यासाठी शेकडो लोकांनी गर्दी केली (फोटो - सोशल मीडिया)
Oil Collection After Ayodhya Deepotsav: उत्तर प्रदेश: संपूर्ण देशामध्ये दीपावलीचा मोठा उत्साह आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर उत्तर प्रदेशमध्ये भव्य स्वरुपात दीपोत्सव साजरा केला जातो. श्री रामजन्मभूमी असलेल्या अयोध्यानगरीमध्ये लाखो दिव्यांनी अक्षरशः उजळून जाते. संपूर्ण शरयू नदीच्या तीरावर लाखो दिवे लावले जातात. आतिषबाजी आणि विद्युतरोषणाईने परिसर दुमदुमून गेलेला असतो. मात्र या दीपोत्सवानंतर उत्तर प्रदेशमधील भयान वास्तव समोर आले. दिवे विजल्यानंतर अनेक चिमुरडे हे तेल गोळा करताना दिसून आले. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने यंदा अयोध्येत ९ वा दीपोत्सव साजरा केला. भगवान रामाच्या जीवनातील २१ घटनांचे चित्रण करणारे चित्ररथ प्रदर्शित करण्यात आले, ३डी लाईट शो, २,१२८ पुजाऱ्यांनी सादर केलेली भव्य आरती आणि सुमारे २६ लाख दिवे (मातीचे दिवे) लावण्यात आले. या सर्व दिमाखदार उत्सवानंतर वास्तव समोर आले आहे. जेवणासाठी हे तेल वापरण्यासाठी शेकडो लोक शरयूच्या तीरावर दिसून आले. दिव्यांमध्ये उरलेले हे तेल घेण्यासाठी झुंबड उडाली होती. यामुळे एकीकडे दिवाळीचा उत्साह असताना दुसरीकडे जगण्याचा संघर्ष दिसून आला. यावरुन अखिलेश यादव यांनी देखील टीकास्त्र डागले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दिवाळीच्या उत्साहानंतर उत्तर प्रदेशमधील शेकडो लोक हे दिव्यांमधील तेल गोळा करत होते. यावर समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांनी व्हिडिओ शेअर करत टीका केली. त्यांनी लिहिले की, “सत्य हेच आहे की, ही दृश्ये खरी आहेत, लोकांना झगमगाट दाखून काहीजण नंतर निघून गेले. प्रकाशानंतरचा हा अंधार चांगला नाही.” अखिलेश यादव यांनी यापूर्वी योगी सरकारच्या दिव्यांवर होणाऱ्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि लोकांच्या जीवनात प्रकाश आणणाऱ्या उद्देशांसाठी हे पैसे वापरण्याची मागणी अखिलेश यादव यांनी केली आहे.
सच तो ये दृश्य हैं… वो नज़ारा नहीं जिन्हें दिखाकर लोग चले गये। रोशनी के बाद का ये अंधेरा अच्छा नहीं। pic.twitter.com/k35h4rHczu — Akhilesh Yadav (@yadavakhilesh) October 20, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजप सरकार दिवे विझवण्याचे पाप करत आहे – सुरेंद्र राजपूत
अयोध्या दीपोत्सवातील आणखी एक व्हिडिओ शेअर करताना काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत म्हणाले, “जळणारे दिवे विझवणे हे पाप आहे आणि भाजप सरकार हे पाप करत आहे!” त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दीपोत्सवानंतर स्वच्छता कर्मचारी जळणारे दिवे विझवून टाकताना दिसत आहेत. सुरेंद्र राजपूत म्हणाले, “सनातन धर्मात जळणारा दिवा विझवणे अशुभ, धर्मविरोधी आणि पाप मानले जाते. पण भाजप ते मानत नाही. भाजप सरकार अयोध्येत दिवे लावून जागतिक विक्रम प्रस्थापित करते, पण तेच दिवे विझवून ते अशुभ बनवत आहे आणि देशाला आणि नागरिकांना आपत्तीत टाकत आहे.”असे सुरेंद्र राजपूत म्हटले आहे.
जलते दिये बुझाना अधर्म है और ये अधर्म भाजपा सरकार कर रही है! सनातन धर्म में जलते हुए दिये बुझाना अशुभ माना जाता है धर्म विरुद्ध माना जाता है पाप माना जाता है।
पर भाजपा है के मानती नहीं भाजपा सरकार अयोध्या में दिये जला कर विश्व रिकॉर्ड तो बनाती है पर उन्ही दियो को बुझा कर अशुभ कर… pic.twitter.com/FoR3rRAeYj — Surendra Rajput (@ssrajputINC) October 20, 2025