व्ही. विजयसाई रेड्डी यांनी राजकीय संन्यास घेऊन शेती करण्याचा निर्णय घेतला आहे (फोटो - Istock)
अमरावती : शेती हा व्यवसाय करणाऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणून गौरवलं जातं. मात्र निसर्गाच्या खेळावर अबलंबून असलेला हा व्यवसाय करायला आता सहसा लोक धजावत नाहीत. अनियमितता आणि पावसाची कमरता यामुळे सध्याचे तरुण हे शेतीकडे वळत नाहीत. मात्र राजकीय वर्तुळातील एका राजकारण्याने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यसभेतील एका खासदाराने शेती करण्याचा निर्णय घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. राजकीय वर्तुळामध्ये त्यांच्या या निर्णयाचे कौतुक आणि आश्चर्य व्यक्त केले आहे.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांचे विश्वासू म्हणून व्ही. विजयसाई रेड्डी यांनी शेतीचा निर्णय घेतला आहे. व्ही. विजयसाई रेड्डी यांनी राजकीय संन्यास घेतला आहे. सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केल्याने सर्वांनाच धक्का बसला. 25 जानेवरी, 2025 रोजी ते राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यानंतर त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारकीचे मोठे पॅकेज सोडून त्यांनी शेतीचा निर्णय घेतला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
विजयसाई हे व्यवसायाने सनदी लेखापाल (CA) आहेत. ते अनेक वर्षांपासून वाय एस. कुटुंबाचे अगदी जवळचे आहेत. ते दिवंगत वाय. एस. राजशेखर रेड्डी आणि त्यांचे मुलगा वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. हा निर्णय पूर्णपणे व्यक्तिगत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी राजकीय संन्यास घेतल्यानंतर काय करणार याची पण घोषणा केली आहे.
रेड्डी यांची ईडीकडून चौकशी
व्ही. विजयसाई रेड्डी यांनी आता शेती करण्याचा निर्णय घेतला असला तरी देखील काही दिवसांपूर्वी ईडीने चौकशी केली आहे. काकीनाडा सी पोर्टप्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. या पोर्ट्स लिमिटेडचे जे प्रमोटर्स आहेत, त्यांच्यावर शेअर कमी किंमतीत विक्री करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. याप्रकरणात रेड्डी हे तपास यंत्रणेसमोर उभे ठाकले होते. त्यांनी हे आरोप फेटाळले.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
राजकीय संन्यास घेतल्यानंतर थेट राजीनामा
व्ही. विजयसाई रेड्डी यांनी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजीनामा दिला आहे. त्यांनी राजकीय संन्यास घेताना सांगितले की, कोणतेही पद, लाभासाठी, दबाव टाकण्यासाठी अथवा राजकीय फायद्यासाठी आपण राजीनामा देत नसल्याचे तसेच इतर कोणत्याही पक्षात प्रवेशासाठी आपण राजीनामा देत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी आपली शेती करण्यात आवड होती. आता राजीनामा दिल्यानंतर आपण शेतीवर लक्ष देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता शेती करून चांगलं उत्पादन घेण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितलं.