हिंदूंवरील अत्याचारा विरोधात विहिंपचे आंदोलन
वरील सर्व मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले यावेळी विश्व हिंदू परिषदे महाराष्ट्र समरसतेचे रवींद्रजी साळे , जिल्हा मंत्री शिवाजीराव जाधव सहमंत्री गोपाळ सुरवसे, बजरंग दल जिल्हा संयोजक श्रीनाथ संगीत, धर्म प्रचार प्रमुख नागेश बागडे महाराज, वालचंद जामदार, प्रवीण कुलकर्णी,वारकरी पालक संघाचे रामकृष्ण वीर महाराज, हिंदू महासभा चे अभयसिंह कुलकर्णी, अनुप देवधर, निलेश लंके,तुकाराम कवठेकर, गणेश महाराज जाधव, तुकाराम खंदाडे ,ओंकार वैद्य, कौस्तुभ देशपांडे, वासुदेव हेगडे आदी उपस्थित होते.
पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी
पश्चिम बंगालमध्ये हिंदू समाजावर सातत्याने होणारे हल्ले, जाळपोळ, धार्मिक द्वेष भावना वाढविणारे प्रकार आणि शासन यंत्रणेचे अपयश हे चिंतेचे कारण बनले आहे.त्यामुळे पश्चिम बंगालचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद व मावळ तालुका बजरंग दलाच्या वतीने शनिवार ( दि १९ ) मावळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले
Murshidabad Violence: मुर्शिदाबाद हिंसाचाराबाबतची ‘ती’ याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
यावेळी विश्व हिंदू परिषदे बजरंग दलाचे मावळ मंत्री सोमनाथ दाभाडे, जिल्हा मंत्री महेंद्र असवले, प्रांत सहसंयोजक संदेश भेगडे, तालुकामंत्री अमोल पगडे, सहमंत्री आकाश वारुळे, सचिन शेलार, योगेश शेटे, प्रखंड मंत्री बजरंग कांबळे, दर्शन वहिले, भूषण वहिले, अनंता कुडे, अमोल ठोंबरे, किरण आचार्य, योगेश ढोरे, निखिल भांगरे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
निवेदनात काय?
या सभेत सोमनाथ दाभाडे, महेंद्र असवले, राजश्री वाकचौरे आदींनी मनोगत व्यक्त करून, बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. पश्चिम बंगालमध्ये वक्फ बोर्ड कायद्याविरोधात होत असलेल्या आंदोलनात हिंदूंना टार्गेट करून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी झाल्या असून येथील कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारबाबत मौन बाळगले आहे, मुस्लिम मतांसाठी ममता बॅनर्जी या लाचार झाल्या आहेत. कायम हिंदू विरोधी भूमिका ममता बॅनर्जी सरकारने घेतली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये हिंदूंचे जगणे मुश्किल झाले असून यामुळे ममता बॅनर्जी यांचा जाहीर निषेध करण्यात आला.