G20 शिखर परिषद (G20 Summit 2023) आजपासून दिल्लीच्या प्रगित मैदानात तयार करण्यात आलेल्या ‘भारत मंडपम’मध्ये सुरू आहे. या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेले सर्व परदेशी नेते आणि संघटना प्रमुखांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन जेव्हा G20 परिषदेसाठी भारत मंडपममध्ये दाखल झाले, तेव्हा मोदींनी त्यांचं हसतमुखाने स्वागत केलं, आणि त्यांना पंतप्रधान मोदींनी त्यांच्यामागे असलेल्या कोणार्क चक्राविषयी (Konark Chakra in G20 Summit) माहिती दिली. हे काणार्क चक्र नेमकं काय आहे. त्याचा काय इतिहास आहे. हे जाणून घ्या.
[read_also content=”दिल्लीत G20 शिखर परिषदेला सुरुवात! भारत मंडपममध्ये पंतप्रधान मोदींनी विशेष पाहुण्यांचे केलं स्वागत https://www.navarashtra.com/india/delhi-g20-summit-begins-in-delhi-prime-minister-modi-welcomes-special-guests-at-bharat-mandapam-nrps-455703.html”]
भारत मंडपममधध्ये प्रवेशस्थळी भलंमोठ कोणार्क चक्र उभारण्यात आलं आहे. या कोणार्क चक्राचा इतिहासही फार रंजक आहे. हे चक्र १३व्या शतकात नरसिंहदेव-१ च्या कारकिर्दीत निर्माण झाले होते. या चाकामध्ये 24 आरे आहेत. हेच चक्र वर्तुळ भारताच्या राष्ट्रध्वजात म्हणजेच तिरंग्यात देखील वापरले गेले आहे. तो आपल्याला सतत पुढे जाण्याची प्रेरणा देत असते.
विश्लेषक आणि तज्ञांनी सांगितले की, कोणार्क चक्र हे भारताचे प्राचीन ज्ञान, प्रगत सभ्यता आणि वास्तुशास्त्रातील उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. कोणार्क चक्र काळाची सतत चालणारी हालचाल, काळाचे चक्र तसेच प्रगती आणि सतत बदल दर्शवते. कोणार्क चक्र हे लोकशाहीच्या चाकाचे शक्तिशाली प्रतीक आहे. हे लोकशाही आदर्शांची लवचिकता आणि समाजाच्या प्रगतीसाठी वचनबद्धता देखील दर्शवते.
कोणार्क मंदिराचे प्रतीक असलेली विशाल चाकाची पितळी मूर्तीही नवीन संसद भवनात बसवण्यात आली आहे. हे दरवाजाच्या उजव्या बाजूला स्थापित केले आहे. कोणार्क मंदिराचे हे विशाल चक्राला ओडिशाचे उत्कल म्हणूनही ओळखले जाते.