नवी दिल्ली : देशभरातील लाखो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी च्या 11व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पीएम किसानचा 11 वा हप्ता कधी मिळणार? याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे.
दरम्यान केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक 6000 रुपये जमा करते. या योजनेचा 10 वा हप्ता 1 जानेवारी 2022 रोजी 10 वा हप्ता जारी करण्यात आला. आता 11 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
ई-केवायसी करणे बंधनकारक
मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशभरातील 12.5 कोटी शेतकऱ्यांनी पीएम किसान निधीसाठी नोंदणी केली आहे. त्याचवेळी, सरकारने प्रत्येकासाठी 11 व्या हप्त्यापूर्वी ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहेत. यासाठी ई-केवायसी करण्याची तारीखही वाढवण्यात आली आहे. सुरूवातीला ई-केवाईसीची अंतिम मुदत 31 मार्च होती, परंतु आता ती 31 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली आहे, परंतु 20 टक्के शेतकरी असे आहेत की त्यांनी अजूनही ई-केवाईसी केलेली नाही.
पीएम किसानचा 11 वा हप्ता केव्हा मिळणार?
आतापर्यंत केंद्र सरकारने देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसानचे 10 हप्ते जमा केले आहेत. आता शेतकऱ्यांना 11 व्या हप्त्याची आतुरता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार योजनेचा 11 वा हप्ता 31 मे पर्यंत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. अजूनही 31 मे ही तारीख दूर आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नसेल तर लवकर करायला हवी. पीएम किसान अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार इतकी आर्थिक मदत दिली जाते.
[read_also content=”मुंबई – गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे; कोकणातील पत्रकार उद्या तहसिलदारांना निवेदनं देणार https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai-goa-highway-should-be-named-after-balshastri-jambhekar-journalists-from-konkan-will-give-statement-to-tehsildar-tomorrow-nrdm-280893.html”]
फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार PM किसानचा लाभ
पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता जारी करण्यापूर्वी केंद्र सरकारने योजनेत दोन मोठे बदल केले आहेत. जर कोणत्याही शेतकऱ्याने पीएम किसान योजनेचे ई-केवाईसी केली नाही. तर त्या शेतकऱ्याला 11 व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. याशिवाय केंद्र सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधेतही मोठा बदल केला आहे. आता तुमच्या हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान खात्यावर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. यानंतरच तुम्ही तुमच्या हप्त्याची स्थिती तपासू शकाल.






