कोण आहेत एन रामचंद्र राव, ज्यांच्यामुळे टी. राजा सिंह यांना द्यावा लागला राजीनामा
Telangana News: देशभरात भाजपच्या गोटात सध्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी देशभरात भाजपशासित राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीही सुरू आहेत. अशातच तेलंगणातील प्रदेशाध्यक्षपदी एन रामचंद्र राव यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर भाजपचे कट्टर नेते टी. राजा सिंह यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे तेलंगणाच्या राजकीय वर्तुळात अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे.
एन. रामचंद्र राव हे भाजपचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते असून, विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ब्राह्मण समाजातून येणारे राव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) या संघटनांशी दीर्घ काळापासून जोडले गेलेले आहेत. पक्षात ते एकनिष्ठ आणि संघनिष्ठ चेहरा म्हणून ओळखले जातात. तेलंगणात भाजपमध्ये अंतर्गत समतोल साधण्यासाठी आणि सर्व गटांना विश्वासात घेण्यासाठी त्यांच्या नावाची निवड झाल्याचे बोलले जाते.
तेलंगणामधील संघ नेत्यांच्या एका गटाने आणि पक्षाच्या एका गटाने केंद्रातील नेतृत्वाकडे रामचंद्र राव यांच्या नावाची शिफारस केली. त्यानंतर पक्षाने प्रदेशाध्यक्षपदी एन, रामचंद्र राव यांच्या नावाची घोषणा केली. रामचंद्र राव यांची आरएसएसचे कट्टर आणि एकनिष्ठ सदस्य अशी ओळख आहे. त्यांचे आरएसएसमध्ये घनिष्ठ संबंधही आहेत. ते अभाविपच्या शाळेत वाढले आहेत. ते भाजपचे कट्टर नेते आहेत. पक्षाच्या सर्व घटकांना ते स्वीकारार्ह असल्याने पक्षाने त्यांची निवड केल्याचे बोलले जात आहे.
ते ब्राह्मण समाजाचे असले तरी, साडेतीन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीपर्यंत पक्ष टिकवून ठेवण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असल्याने निवडणुकीपूर्वी पक्ष नवीन चेहरा निवडू शकतो. तज्ञांचा असा विश्वास आहे की मग पक्ष मागासलेल्या जातीतील नेता निवडू शकतो. रामचंद्र राव यांच्याव्यतिरिक्त निजामाबादचे खासदार धर्मपुरी अरविंद आणि केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांच्यासह अनेक नावे चर्चेत होती.
अँटीऑक्सिडंट युक्त दालचिनीचे पाणी आरोग्यासाठी ठरेल गुणकारी, फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित
तेलंगणात टी. राजा सिंह हे भाजपचे एक फायरब्रँड नेते मानले जातात. पण भाजपचा त्यांनी नाराजीतून भाजपचा राजीनामा दिल्यामुळे भाजप त्यांची मनधरणी करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचवेळी टी. राजा त्यांचा स्वतःचा नवीन पक्ष स्थापन करतील, अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत.