RJD चा बालेकिल्ला भाजपचं नवं टार्गेट! भोजपुरीपट्टा भाजपसाठी इतका महत्त्वाचा का? वाचा सविस्तर
बिहारमध्ये २०२५ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. अद्याप निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झालेला नसला तरी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींना भोजपुरी पट्ट्यात सक्रिय करून यावेळी पक्षाची रणनिती अधिक आक्रमक असणार असल्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रीय जनता दलाचा (RJD) बालेकिल्ला असलेल्या भोजपुरी पट्ट्यात विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे राजदची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
हा केवळ निवडणूक प्रचार नसून वर्चस्वाची लढाई बनली आहे. राष्ट्रीय जनता दल (RJD गेल्या काही निवडणुकांमध्ये मजबूत स्थितीत आहे. अशा भागावर भाजपने लक्ष्य केंद्रित केली आहे. भाजपने भोजपुरी पट्टा म्हणजेच बिहारच्या सुमारे १० जिल्ह्यांतील १०० विधानसभा मतदारसंघांमध्ये रणनीती आखण्याची मोहीम सुरू केली आहे.
PM Modi : PM मोदींनी का नाकारलं ट्रम्प यांचं आमंत्रण? ओडिशातील सभेत स्वत: केला खुलासा
बिहारमधील सीवान, सारण, गोपालगंज, भोजपूर, बक्सर, कैमूर, रोहतास, औरंगाबाद, तसेच पूर्वी आणि पश्चिम चंपारण हे जिल्हे भोजपुरी भाषिक पट्टा माणला जातो. या भागांमध्ये एकूण ७३ विधानसभा मतदारसंघ आहेत. याशिवाय मुजफ्फरपूर व कटिहारसारख्या जिल्ह्यांतील काही भागांमध्येही भोजपुरी बोलणारे मतदार निर्णायक भूमिका बजावतात. एकून १०० विधानसभा मतदारसंघांमध्ये भोजपुरी भाषिक मतदारांचा मोठा प्रभाव आहे.
सीवान – ८
सारण – १०
गोपालगंज – ६
भोजपूर – ७
बक्सर – ४
कैमूर – ४
रोहतास – ७
औरंगाबाद – ६
पश्चिम चंपारण – ९
पूर्वी चंपारण – १२
२०२० आणि २०२४ मधील पराभवातून धडा
२०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत RJDच्या नेतृत्वाखालील महागठबंधनने भोजपुरी पट्ट्यातील ७३ पैकी ४५ जागांवर विजय मिळवला होता. एनडीए केवळ २७ जागांवरच आटोपला. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपला बक्सर, आरा, काराकाट व औरंगाबादसारख्या पारंपरिक जागा गमवाव्या लागल्या. या सलग पराभवांमुळे भाजप अधिक सजग झाली असून यंदा निवडणुकीपूर्वीपासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
पंतप्रधान मोदींचं लक्ष्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन आठवड्यांत दोन वेळा भोजपुरी भागात पोहचले आहेत. २० जून रोजी त्यांनी सीवानमध्ये ६६०० घरांचे लोकार्पण केलं आणि अनेक विकास प्रकल्पांची घोषणा केली. त्याआधी २९ मे रोजी बिक्रमगंज (काराकाट लोकसभा क्षेत्रात) येथे कोट्यवधींच्या प्रकल्पांचा शुभारंभ केला. या दौऱ्यांमागे निव्वळ संयोग नाही, तर स्पष्ट रणनिती आहे. याच क्षेत्रात २०२० आणि २०२४ मध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता.
Rahul Gandhi : अमित शहांच्या विधानावर राहुल गांधींचा पलटवार; म्हणाले, गरिबांच्या मुलांनी इंग्रजी शिकू नये म्हणून भाजप…
भोजपुरी पट्ट्यात भाजपने पाय रोवले, तर RJDची पारंपरिक ताकद ढासळू शकते.
जातीय समीकरणांचं पुर्नबांधणी
यादव, कुशवाहा, भूमिहार, राजपूत आणि दलित मतदारांना वेगवेगळ्या सामाजिक समीकरणांद्वारे आकर्षित करण्याचा प्रयत्न.
विकास बनाम वंशवाद
मोदींच्या भाषणांतून RJDच्या “परिवारवादाविरुद्ध” विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत. आजही सीवानमध्ये त्यांनी सांगितलं, “भाजप सर्वांचा विकास करतो, पण RJD आणि काँग्रेस केवळ त्यांच्या कुटुंबाचा.”
मोदी फॅक्टरचा प्रचार:
यावेळी भाजप नीतीश कुमार नव्हे, तर थेट मोदी यांच्या लोकप्रियतेवर खेळणार आहे.
पुढील रणनीती कशी असेल?
मोठ्या नेत्यांचे दौरे
केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री चेहरा नियमितपणे भोजपुरी पट्ट्यात पाठवला जाईल.
विकास प्रकल्पांची मालिका
रस्ते, रेल्वे, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात मोठ्या घोषणा होतील.
स्थानिक नेतृत्व
प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक प्रभावशाली चेहऱ्यांना पुढे आणण्याचा भाजपचा प्रयत्न असेल.
भाजपने यावेळी बिहारमधील ‘भोजपुरी पट्टा’वर लक्ष केंद्रित करत राजकीय व सामाजिक समीकरणं बदलण्याची तयारी केली आहे. RJDसाठी हा गड कायम राखणं हे अस्तित्वाचं प्रश्न ठरेल, तर भाजपसाठी नवा प्रदेश काबीज करण्यासाठी ही एक नवी संधी असेल. येत्या एक दोन महिन्यात मोठ्या राजकीय घडामोडी बिहारमध्ये पहायला मिळणार असून भाजप कोणती रणनिती आखणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.