नेपाळमधून अयोध्येत आणलेले सुमारे सहा कोटी वर्षे जुने शालिग्राम शिळा (shaligram stone) सध्या चर्चेत आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Mandir) गर्भगृहात भगवान राम आणि माता सीता यांची मूर्ती या शिळेपासून बनवली जाणार आहे. नेपाळच्या (Nepal) गंडकी नदीतुन ही शिळा आणण्यात आली आहेत. 2024 मध्ये मकर संक्रांतीपर्यंत या मूर्ती तयार होतील, असा विश्वास आहे. असा प्रश्न पडतो की शालिग्रामच्या दगडापासूनच देवाच्या मूर्ती का बनवल्या जात आहेत? त्याचे महत्त्व काय? या शिळेपासून मूर्ती बनवता आल्या नाहीत तर काय होईल? चला समजून घेऊया…
[read_also content=”जगातील टॉप-20 श्रीमंतांच्या यादीतून अदानी बाहेर, Hindenberg च्या अहवालानंतर शेअर्समध्ये 60% पर्यंत घसरण! https://www.navarashtra.com/india/adani-out-of-worlds-top-20-richest-list-shares-fall-by-60-after-hindenbergs-report-nrps-367009.html”]
नेपाळच्या गंडकी नदीतून काढलेले या दैवी शिळा उत्तर प्रदेशातील रामनगरी अयोध्येत दाखल झाल्या आहेत. तांत्रिक आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली चार क्रेनच्या मदतीने ही शिळा खाली उतरवण्यात आल्या. अयोध्येत आज वैदिक मंत्रोच्चारासह देव शिळांची पूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर ते राम मंदिर समितीकडे सोपवले जातील, या पूजेसाठी शिळांना फुलांच्या माळांनी सजवण्यात आले होते. नेपाळ ते राम नगरी या प्रवासात ही शिळा जिथून गेली तिथून ते पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली.
हिंदू धर्मात शालिग्राम शिळेला विशेष महत्त्व आहे. या दगडाला भगवान विष्णूचे रूप मानून त्याची पूजा केली जाते. याला सालग्राम असेही म्हणतात. शालिग्राम दुर्मिळ आहेत, जे सर्वत्र आढळत नाहीत. नेपाळच्या मुक्तिनाथ प्रदेशात, काली गंडकी नदीच्या काठावर बहुतेक शालिग्राम आढळतात. शालिग्राम अनेक रंगांचे असतात. पण सुवर्ण आणि ज्योतींनी युक्त शालिग्राम हा दुर्मिळ मानला जातो. शास्त्रानुसार शालिग्रामचे 33 प्रकार आहेत, त्यापैकी 24 प्रकार भगवान विष्णूच्या 24 अवतारांशी संबंधित आहेत. यामुळेच शाळीग्रामला भगवान विष्णूचे रूप मानले जाते.
शालिग्राम हे विष्णूचे देवता रूप म्हणून पूजले जाते. असे म्हटले जाते की जर शालिग्राम गोल असेल तर ते भगवान विष्णूचे गोपाल स्वरूप आहे आणि जर ते माशाच्या आकारात असेल तर ते मत्स्य अवताराचे प्रतीक मानले जाते. शालिग्राम जर कासवाच्या आकारात असेल तर ते कूर्म आणि कछाप अवताराचे प्रतीक मानले जाते. शालिग्रामवरील नक्षीदार चक्रे आणि रेषा हे विष्णूच्या इतर अवतारांचे आणि रूपांचे प्रतीक मानले जातात. विष्णूजींच्या गदा स्वरूपात चक्राचे प्रतीक आहे. लक्ष्मीनारायण रूपात दोन, त्रिविक्रमात तीन, चातुर्व्यूह स्वरूपात चार, वासुदेव रूपात पाच. हिंदू परंपरेनुसार या खडकांमध्ये ‘वज्र-कीत’ नावाचा छोटा कीटक राहतो. कीटकाला हिऱ्याचा दात असतो जो शालिग्राम शिळा चावतो आणि त्याच्या आत राहतो. वैष्णवांच्या मते शाळीग्राम हे भगवान विष्णूचे निवासस्थान आहे आणि जो कोणी तो पाळतो त्याने त्याची रोज पूजा करावी. आंघोळ केल्याशिवाय शालिग्रामाला स्पर्श न करणे, शाळीग्राम कधीही जमिनीवर ठेवू नये, सात्विक आहाराचा त्याग करू नये, वाईट आचरण करू नये असे कठोर नियमही त्याने पाळावेत. स्वतः भगवान श्रीकृष्णाने महाभारतात युधिष्ठिराला शालिग्रामचे गुण सांगितले आहेत. मंदिरे त्यांच्या विधींमध्ये कोणत्याही प्रकारचे शालिग्राम वापरू शकतात.