प्रयागराज महाकुंभमेळा मौनी पूर्णिमेच्या अमृत स्नानासाठी योगी सरकारची तयारी पूर्ण झाली आहे (फोटो - नवराष्ट्र)
प्रयागराज : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. 144 वर्षांनी होणाऱ्या या महाकुंभमेळ्यामध्ये कोट्यवधी भाविकांनी सहभाग घेतला आहे. आत्तापर्यंत करोडो भाविकांनी आणि नागा साधूंनी अमृतस्नान केले आहे. महाकुंभमेळ्यामध्ये मौनी अमावस्येला चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना झाली. आता लवकरच मौनी पौर्णिमा असून यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे.
महाकुंभमेळ्यामध्ये सहा दिवस गंगेमध्ये पवित्र स्नान केले जातील. या सहा दिवसांपैकी एक असलेल्या पाचव्या स्नानासाठी मौनी पौर्णिमा ओळखली जाते. मौनी अमावस्येच्या दिवशी देखील अमृतस्नानाला आलेल्या कोट्यवधी लोकांमध्ये गोंधळ झाला आणि यामुळे चेंगराचेंगरी झाली. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी खास प्लॅनिंग केले आहे. माघी पौर्णिमेला (१२ फेब्रुवारी) गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने मंगळवारी (११ फेब्रुवारी) पहाटे ४ वाजल्यापासून परिसरात नो व्हेईकल झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाकुंभमेळ्यामध्ये उद्या (दि.12) मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. अमृतस्नानासाठी आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी संगम परिसरात नो व्हेईकल झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तर, वेगवेगळ्या मार्गांसाठी वेगवेगळे पार्किंग झोन निश्चित करण्यात आले आहेत, तिथे शहराबाहेरून येणाऱ्या भाविकांना त्यांची वाहने पार्क करावी लागतील. उद्याच्या संपूर्ण दिवस हीच वाहतूक व्यवस्था लागू राहील. तर, अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवांना निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. संगमाजवळ ठराविक काळासाठी राहणाऱ्या कल्पवासींच्या वाहनांनाही हे निर्बंध लागू असतील.
तसेच प्रयागराजमध्ये जाण्यासाठी चालत पायपीट करावी लागणार आहे. भाविकांना कदाचित ८ ते १० किमी पायी चालत प्रवास करावा लागेल. बॉर्डरपासूनच शटल बस किंवा ऑटोने प्रयागराजमध्ये प्रवेश करावा लागेल. तिथून महाकुंभ येथे पोहोचायला 8 ते 10 किमी पायी चालावे लागणार आहे. रस्त्यांवर वाहनांच्या लांब रांगा लागू देऊ नयेत. वाहतूक कोंडी कोणत्याही परिस्थितीत रोखली पाहिजे”, असे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मौनी अमावस्येला झाली होती चेंगराचेंगरी
महाकुंभमेळ्यामध्ये 29 आणि 30 जानेवारी रोजी रात्री मौनी अमावस्या होती. अमावस्येच्या दिवशी पहाटे २ वाजता प्रयागराज महाकुंभ मेळा परिसरात चेंगराचेंगरी झाली होती. घटनेच्या सुमारे १६ तासांनंतर, महाकुंभ प्रशासनाने चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू आणि ६० जण जखमी झाल्याची माहिती दिली होती. चेंगराचेंगरीच्या कारणांची चौकशी करण्यासाठी आणि एका महिन्यात अहवाल सादर करण्यासाठी तीन सदस्यीय न्यायिक आयोग नियुक्त करण्यात आला आहे. १० फेब्रुवारीपर्यंत ४४.७४ कोटी लोक कुंभमेळ्याला हजेरी लावली असून अमृतस्नान केले आहे. यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अमृतस्नान केले आहे.