SRH vs RR Live: सनरायझर्सच्या हर्षल पटेलने राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का दिला आहे. राजस्थान रॉयल्सचे दमदार शिलेदार संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांना बाद केले आहे. सॅमसनने 37 चेंडूत 66 धावा केल्या. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 4 षटकार मारले. 14व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हर्षलने कॅच घेत सॅमसनला बाद केले. 14व्या षटकाच्या शेवटी राजस्थान रॉयल्सना मोठी हुलकावणी मिळाली. ॲडम झाम्पाने 15व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ध्रुव जुरेलला बाद केले. जुरेलने 35 चेंडूत 70 धावा केल्यानंतर इशान किशनला झेलबाद केले. त्याच्या बॅटमधून 5 चौकार आणि 6 षटकार आले. राजस्थानने 16 षटकात 5 विकेट गमावत 173 धावा केल्या आहेत. शिमरॉन हेटमायर 7 चेंडूत 9 धावा करून नाबाद असून शुभम दुबे 3 चेंडूत 3 धावा करून नाबाद आहे.
पहिले तीन विकेट पडल्यानंतर संजू सॅमसनने ध्रुव जुरेलसह सनरायझर्सच्या गोलंदाजांवर प्रतिआक्रमण केले.दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. राजस्थानने 13 षटकांत 3 बाद 151 धावा केल्या आहेत. ध्रुव जुरेल 31 चेंडूत 68 आणि सॅमसन 33 चेंडूत 59 धावा करून नाबाद आहे. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी केली आहे.
नितीश राणाच्या रूपाने राजस्थानला तिसरा धक्का बसला. पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तो मोहम्मद शमीने बाद केला.शमीच्या चेंडूवर नितीशला मोठा फटका मारायचा होता, पण चेंडू खूप वर गेला.सनरायझर्सचा कर्णधार पॅट कमिन्सने कोणतीही चूक केली नाही आणि नितीशचा डाव अप्रतिम झेल देऊन संपुष्टात आणला.नितीशने 8 चेंडूत 11 धावा केल्या. राजस्थानने 5 षटकात 3 गडी बाद 57 धावा केल्या आहेत. संजू सॅमसन 12 चेंडूत 32 धावा आणि ध्रुव जुरेल 3 चेंडूत 3 धावा केल्या आहे. राजस्थान रॉयल्स संघाकडे 287 लक्ष्य असून 5 विकेट गेल्या आहेत. राजस्थान रॉयल्स लक्ष्य पूर्ण करणार की सनरायझर्स विजय पटकवणार हे पाहणं औस्त्युक्याचं ठरणार आहे.