अमित शहा यांची कॉँग्रेसवर टीका (फोटो- ट्विटर)
धुळे: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचार जोरदारपणे सुरू आहे. दरम्यान निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान महाविकास आघाडीतर्फे राहुल गांधी यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या आहेत. तर महायुतीकडून नितीन गडकरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे राज्यभर प्रचारसभा घेत आहेत. दरम्यान धुळ्यातील एक प्रचारसभेत अमित शहा यांनी कलम ३७० वरून कॉँग्रेस आणि महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक जिंकल्यानंतर कलम ३७० पुन्हा आणण्यासंदर्भात विधेयक मांडण्यात आले. दरम्यान त्यावरून राजकारण तापले आहे. हाच मुद्दा सध्या महायुतीच्या प्रचारसभेत महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. या मुद्द्यावरून अमित शहा यांनी कॉँग्रेसवर टीका केली आहे. “कॉँग्रेसला कलम ३७० पुन्हा आणायचे आहे. मात्र कोणत्याही परिस्थिती जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० लागू होणार नाही. राहुल गांधीच काय तर इंदिरा गांधी जरी स्वर्गातून खाली आल्या तरीही जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० काही केल्या परत येणार नाही, अशी डरकाळीच अमित शहा यांनी फोडली आहे.”
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर स्थापन झालेल्या नवीन सरकारने कलम ३७० पुन्हा एकदा लागू करण्याबाबत पुन्हा एकदा राजकारण सुरू झाले आहे. जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत कलम ३७० बाबत एक विधेयक मांडण्यात आले. त्यावरून फार मोठा गदारोळ उडाला. भाजपने यावरून कॉँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे कलम ३७० परत आणणारच. यामुळे तेथील विधानसभेत अनेकदा तणाव निर्माण झाला आहे. यावरून अमित शहा यांनी कॉँग्रेसवर टीका केली आहे.
पुढे बोलताना अमित शहा म्हणाले, “महयुतीचा अर्थ विकास आणि महाविकास आघाडीचा अर्थ म्हणजे विनाश. कोणाला सत्तेत आणायचे आहे हे जनतेने ठरवायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला समृद्ध, विकसित आणि सुरक्षित बनवले आहे. कॉँग्रेसच्या काळात भारताची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावर होती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताची अर्थव्यवस्था ५ व्या स्थानावर आणली आहे. लवकरच जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था होणार आहे.
हेही वाचा: Maharashtra Elections 2024 : महायुतीचा पुढील मुख्यमंत्री कोण? अमित शहा यांचे जाहीर सभेत संकेत
अमित शहा यांनी महाविकास आघाडीवर टीका केली असून राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी पुन्हा एकदा मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी मतदारांना केले. भाषण करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाष्य केले. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. म्हणून, प्रत्येक दिवशी आपण सर्वांनी निर्णायक भूमिका बजावली पाहिजे. मी दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणायचं आहे, अशी इच्छा महाराष्ट्रातील जनतेची आहे, असे अमित शाह म्हणाले.