om birla- k suresh
नवी दिल्ली : 18व्या लोकसभेच्या पहिल्या संसदेच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी (24 जून) लोकसभेत 280 खासदारांनी शपथ घेतली. आज (25 जून) दुसऱ्या दिवशी उर्वरित २६४ खासदार लोकसभेच्या सदस्यपदाची शपथ घेत आहेत. पण सध्या लोकसभा अध्यक्षपदावरून महायुती आणि महाआघाडीत चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
सुरूवातीला लोकसभा अध्यक्ष हे महायुतीचे असतील अशी चर्चा सुरू होती. त्यासाठी काँग्रेसने त्यांना पाठिंबाही दर्शवला. पण लोकसभेचे उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला देण्याचा नियम आहे. याबाबत काँग्रेसने मागणी केली असता भाजपकडून कोणतेही उत्तर आले नाही. त्यामुळे आता काँग्रेसनेही लोकसभा अध्यक्षपदावर दावा करत आपला उमेदवार उतरण्याची तयारी सुरू केली आहे.
भाजप आणि काँग्रेसच्या या रस्सीखेचीमुळे आता लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचे निश्चित झाले आहे. लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी (26 जून) होणार आहे. आज भाजपकडून आज ओम बिर्ला यांनी तर विरोधक पक्षांच्या वतीने काँग्रेस नेते के. सुरेश यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भारताच्या इतिहासात सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये लोकसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणूगोपाल यांनी केंद्र सरकार विरोधी पक्षाला उपसभापतीपद देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत आता विरोधी पक्षही लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक विरोधक लढवतील, असे स्पष्ट केले.
कोडीकुन्नील सुरेश म्हणजेच के सुरेश हे केरळच्या मावेलीकारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. 1989 पासून ते ही जागा सांभाळत आहेत. त्यांना लोकसभेचा सर्वाधिक अनुभव आहे. ते आतापर्यंत 7 वेळा खासदार झाले आहेत. तसेच के. सुरेश 2012 ते 2014 या काळात काँग्रेस सरकारमध्ये राज्यमंत्री होते. 2018 मध्ये त्यांना केरळ काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बनवण्यात आले. ते एआयसीसीचे सचिवही राहिले आहेत.
18 व्या लोकसभेत सभापती आणि उपसभापतींचा चेहरा जवळपास स्पष्ट झाला आहे. पुन्हा एकदा ओम बिर्ला स्पीकरच्या खुर्चीवर दिसणार आहेत. ते सलग तिसऱ्यांदा राजस्थानमधील कोटा येथून खासदार आहेत. 2019 मध्ये त्यांना प्रथमच सभापती करण्यात आले होते . सभागृहात कडक प्रशासक अशी त्यांची प्रतिमा आहे. तर के. सुरेश यांच्याबद्दल सांगायचे तर ते केरळमधील मावेलिकारा येथून खासदार आहेत. ते ८व्यांदा खासदार म्हणून निवडून आले असून त्यांना लोकसभा सदस्य म्हणून सर्वाधिक अनुभव आहे.
लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक 26 जून म्हणजेच उद्या होणार आहे. 27 जून रोजी राष्ट्रपती मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. विरोधी पक्षानेही या पदासाठी आपला उमेदवार घोषित केला आहे. कनिष्ठ सभागृहाच्या सभापती पदासाठी पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. स्वातंत्र्यानंतर लोकसभेच्या अध्यक्ष आणि उपसभापतींची निवडणूक सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात सहमतीने होत आहे. 543 सदस्यांच्या लोकसभेत, एनडीएकडे 293 खासदार आहेत आणि त्यांना स्पष्ट बहुमत आहे, तर विरोधी इंडिया ब्लॉककडे 234 खासदार आहेत.