फोटो सौजन्य: सोशल मीडिया
यंदच्या टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने टी-२० विश्वचषक स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. 2011 नंतर अखेर रोहितच्या नेतृत्वाखाली 13 वर्षांनी भारतीय संघाने विजेतेपद पटकावलं. संपुर्ण भारतभर काल जल्लोष साजारा करण्यात आला. या ऐतिहासिक विजयानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.
अशातच विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माची एक भावनिक पोस्ट व्हायरल होत आहे. भारतीय फलंदाज विराट कोहलीची यंदाच्या टी 20 विश्वचषकची ही शेवटची मॅच होती. कोहली परीवारासाठी हा एक भावनिक क्षण होता. यावेळी अनुष्काने भारतीय संघाच्या पुर्ण टीमचे कौतुक करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने आपली लेक वमिकाचा उल्लेख केला आहे.
अनुष्का म्हणते की “आमच्या मुलीने आज सामना संपल्यानंतर सर्व खेळाडूंना रडताना पाहिले. यावेळी ‘या’ खेळाडूंना धीर देण्यासाठी तिथे कोणी असेल का? असा प्रश्न तिने विचारला. मी तिला म्हणाले, हो डार्लिंग… कारण, आज जवळपास 1.5 बिलियन प्रेक्षकांनी आपल्या खेळाडूंना मिठी मारली आहे. आपल्या टीमने अभूतपूर्व विजय मिळवला आहे. सगळ्यांनी या सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. चॅम्पियन्स – अभिनंदन!”
याशिवाय, अभिनेत्रीने दुसरी पोस्ट खास विराट कोहलीसाठी शेअर केली आहे. यामध्ये विराटचा ट्रॉफी उंचवलेला फोटो आहे. “माझं या माणसावर खूप प्रेम आहे. विराट कोहली… तू माझा आहेस हे सांगताना मला प्रचंड आनंद होतो. आता हा आनंद साजरा करण्यासाठी माझ्यासाठी स्पार्कलिंग वॉटर घेऊन ये” असं अभिनेत्रीने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे. अनुष्काच्या या पोस्टवर नेटकऱ्यांचा लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे. सर्व स्तरांवर भारतीय टीमचे कौतुक होत आहे.