राजेगाव : राजेगाव ते स्वामी -चिंचोली रस्त्याची अवस्था फार बिकट झाली आहे. परतीच्या पावसाने थैमान घातल्याने पाणी रस्त्यावर ठिकाणी साठून राहिले आहे. त्यामुळे रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्याच अंदाज प्रवाशांना येत नाही. त्यामुळे लहान मोठे अपघात या रस्त्यावर वारंवार होत आहेत. या भागातून वाहतूकही मोठया प्रमाणावर केली जात आहे.
-रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी
सध्या ऊस गाळप सुरु झाल्याने ऊस वाहतुकीची वाहने रस्त्यावर अडकून पडत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे.प्रशासनाकडून याची दखल घेऊन जर रस्त्यावरील खड्डे भुजवले तर अपघात होणार नाहीत आणि रहदारी सुरळीत होईल. या रस्त्यावरून शाळकरी मुले, प्रवाशी प्रवास करत असतात. राजेगाव हे आर्थिक केंद्र असल्याने या भागातील नागरिकांना याठिकाणी विविध कामांसाठी यावे लागते मात्र रस्ता चांगला नसल्याने सगळ्याचीच चांगली ताराबळ उडत आहे. लवकरत लवकर या रस्त्याचे खड्डे बुजवण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
[blockquote content=” दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांचा रहदारीचा हा मुख्य रस्ता आहे. या भागातील नागरिकांना पुणे – सोलापूर महामार्गाला जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होते. आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नातून स्वामी चिंचोली ते शिगरोबा माळ /राजेगाव असा रस्ता मंजूर झाला आहे. या रस्त्याचे काम लवकरात सुरु होणार आहे. तेव्हा रहदारी सुरळीत होईल. ” pic=”” name=”-अझरुद्दीन शेख, माजी सरपंच. “]