सौजन्य - rinkukumar12 BCCI ने साजरा केला रिंकू सिंहचा वाढदिवस
BCCI Celebrates Rinku Singh’s Birthday : रिंकू सिंग हा एक उदयोन्मुख तरुण भारतीय क्रिकेटपटू आहे जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशकडून खेळतो. रिंकू सिंगचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 रोजी अलिगढ, उत्तर प्रदेश येथे झाला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. रिंकूचे वडील खानचंद्र सिंग घरोघरी सिलिंडर पोहोचवायचे आणि त्याचा मोठा भाऊ ऑटो चालवून आपला उदरनिर्वाह करत असे. त्यांची आई वीणा देवी गृहिणी आहे. पाच भावंडांमध्ये रिंकू हे आई-वडिलांचे तिसरे अपत्य आहे. रिंकूला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती आणि अत्यंत गरीब आणि सामान्य कुटुंबातील असूनही त्याने सतत मेहनत आणि समर्पणाने क्रिकेटर बनण्याचे स्वप्न पूर्ण केले.
बीसीसीआयकडून रिंकू सिंहला शुभेच्छा
Here's wishing #TeamIndia batter Rinku Singh a very Happy Birthday 😎🎂@rinkusingh235 pic.twitter.com/mAQX5VNbn8
— BCCI (@BCCI) October 12, 2024
रिंकू सिंहचे क्रिकेट करिअर
रिंकू सिंहने आतापर्यंत 25 टी-20 सामने खेळले आहेत तर 2 वनडे सामने खेळला आहे. आयपीएलमध्ये त्याने 45 सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये 55 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात त्याने 471 धावा केल्या आहेत. त्याचा सर्वोच्च स्कोअर 69 आहे, तर एकदिवसीयमध्ये त्याने 38 सर्वाधिक धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने 3 अर्धशतक ठोकले तर IPL मध्ये त्याने 4 अर्धशतक ठोकले आहेत. IPL मध्ये त्याने 893 धावा केल्या आहेत.
कोलकाता संघानेसुद्धा रिंकूला दिल्या शुभेच्छा
May the celebrations never stop, Rinku! 🎂💜 pic.twitter.com/e3ZW8iLM7q
— KolkataKnightRiders (@KKRiders) October 12, 2024
कोलकाता नाईट रायडर्सकडून फलंदाजी
इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळतो. तो डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताचा ऑफब्रेक गोलंदाज आहे. रिंकू सिंग आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्धच्या अत्यंत रोमांचक सामन्यातील शेवटच्या षटकात 5 चेंडूत सलग 5 षटकार ठोकून प्रसिद्धीझोतात आला. त्याने मेहनत आणि कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले आहे.