Rohit Sharma posted a farewell message for Rahul Dravid : विश्वचॅम्पियन बनलेल्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या लाडक्या प्रशिक्षक राहुल द्रविड याला भावनिक पत्र लिहीत इन्स्टावर पोस्ट टाकली आहे. 29 जून रोजी बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर झालेल्या T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने 11 वर्षांनंतर ICC ट्रॉफी जिंकण्यात यश मिळविले. या विजयानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदाचे कौतुक होत असतानाच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या कार्यकाळातील ही सर्वात मोठी उपलब्धी ठरली. या सामन्यासोबतच द्रविडचा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळही संपला. त्यामुळे त्यांना आता निरोप देण्यासाठी ही इन्स्टावर एक पोस्ट करीत आपल्या मनाच्या भावना मोकळ्या केल्या आहेत.
रोहितची लाडका प्रशिक्षक राहुल द्रविडसाठी भावनिक पोस्ट
इन्स्टावर केली पोस्ट
त्याचवेळी रोहित शर्मानेही अंतिम सामना जिंकल्यानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता, द्रविडसोबत घालवलेले सर्व क्षण आठवण्यासोबतच, रोहितने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर त्याच्यासाठी एक भावनिक पोस्ट देखील केली आहे, ज्यामध्ये त्याने काही फोटो देखील शेअर केले आहेत. रोहित शर्माने आपल्या लाडक्या प्रशिक्षकाला निरोप देताना त्याच्या कार्यकाळातील अनुभव सांगितला आहे. याचा दुसरा अर्थ हा आहे की, लवकरच टीम इंडियाला नवीन कोच मिळणार आहे.
तुमच्यासोबत इतक्या जवळून काम करण्याची संधी, हे माझे भाग्य
रोहित शर्माने राहुल द्रविडबद्दल शेअर केलेल्या भावनिक पोस्टमध्ये त्याने लिहिले की, सध्या मी माझ्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द शोधण्याचा प्रयत्न करत आहे, पण मला खात्री नाही की मी तसे करू शकेन पण हा माझा प्रयत्न आहे. . इतरांप्रमाणेच मी लहानपणापासून तुमचा आदर करतो, पण तुमच्यासोबत इतक्या जवळून काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.
तुमची गणना या खेळातील महान व्यक्तींमध्ये केली जाते, परंतु तुम्ही प्रशिक्षक म्हणून या सर्व प्रशंसा आणि यशाचा त्याग केला आणि आमच्यासाठी प्रशिक्षक म्हणून अशा पातळीवर आलात की जिथे आम्हाला तुम्हाला काहीही सांगण्यास सोयीस्कर वाटते. ही तुमच्याकडून आम्हा सर्वांसाठी भेटवस्तूपेक्षा कमी नव्हती. आम्ही सर्वजण तुमच्याकडून खूप काही शिकलो, तुमची नम्रता आणि तुमचे अजूनही खेळावरील प्रेम. मी तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण जपतो. माझी पत्नी तुला माझी कामाची पत्नी म्हणते आणि मी तुला ते म्हणण्यास भाग्यवान समजतो.
तुमच्यासाठी ही गोष्ट मिळवताना आम्हाला खूप आनंद होतोय
या भावनिक पोस्टमध्ये रोहित शर्माने पुढे लिहिले की, तू तुझ्या करिअरमध्ये अनेक मोठे यश संपादन केले आहे, पण आपल्यात ही एकाच गोष्टीची कमी (ICC Trophy) होती, ज्याची मला नेहमी खंत होती अन् मला आनंद आहे की आपण ते एकत्रितपणे मिळवले. राहुल भाई, तुम्हाला माझा विश्वासू, माझा प्रशिक्षक आणि माझा मित्र म्हणवून घेण्यात मी स्वतःला खूप भाग्यवान आणि माझा सन्मान समजतो. द्रविड आणि रोहित यांची प्रशिक्षक-कर्णधार ही जोडी गेल्या तीन वर्षापासून भारतीय संघाचं नेतृत्व करत होती. 2021 टी20 वर्ल्ड कपनंतरच रोहितला भारताचा नियमित कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तसेच द्रविडलाही त्यानंतरच मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते.