विजय हजारे ट्रॉफीत मोठी दुर्घटना, 'हिटमॅन'च्या साथीदाराला गंभीर दुखापत (Photo Credit- X)
अंगक्रिश रघुवंशी झेल घेताना जखमी
या सामन्यात मुंबईला प्रथम फलंदाजी करण्याची संधी देण्यात आली आणि त्यांनी ५० षटकांत ७ गडी गमावून ३३१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तराखंडचा फलंदाज सौरभ रावतने डावाच्या ३० व्या षटकात स्लॉग स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू त्याच्या बॅटच्या वरच्या बाजूला लागला आणि मिड-विकेट सीमारेषेकडे हवेत गेला. तिथे क्षेत्ररक्षण करणारा अंगक्रिश रघुवंशी चेंडू पकडण्यासाठी खूप वेगाने धावला, शेवटी झेल घेण्यासाठी डायव्हिंग केले. तो चेंडू पकडण्यात अपयशी ठरला, परंतु त्याच्या डोक्याला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली.
🚨Angkrish Raghuvanshi rushed to hospital after he got injured while attempting for catch, Hope nothing serious 🙏 📍Jaipur
pic.twitter.com/jWlKHTWh2h — RCB (@RCBtweetzz) December 26, 2025
जमिनीवर पडल्यानंतर, अंगक्रिश रघुवंशीला प्रचंड वेदना होत असल्याचे दिसून आले. मुंबई संघातील इतर खेळाडू आणि वैद्यकीय कर्मचारी ताबडतोब त्याच्याकडे धावले. त्यानंतर त्याला स्ट्रेचरवर मैदानाबाहेर नेण्यात आले आणि रुग्णवाहिकेतून थेट रुग्णालयात पाठवण्यात आले.
फलंदाजी कौशल्य दाखवण्यात ठरला अपयशी
या सामन्यात अंगक्रिश रघुवंशीची फलंदाजी कामगिरी प्रभावी होती. रोहित शर्मासोबत सलामीला येत असताना अंगक्रिशने फक्त ११ धावा काढल्या, तर रोहितही गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात हार्दिक तामोरेने मुंबई संघासाठी ९३ धावांची नाबाद खेळी केली, तर सरफराज खान आणि मुशीर खान या भावांनी प्रत्येकी ५५ धावा केल्या.
हे देखील वाचा






