कोरोना रुग्णांची संख्या देशामध्ये झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. कोरोना लशींचा तुटवडा(Vaccination Shortage) असल्याने लसीकरण मोहिमेला धक्का बसला आहे. अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद आहेत.आता केंद्र सरकार राज्य सरकारला १५ जूनपर्यंत ७ कोटी ८६ लाख लस पुरवणार (vaccine supply to states)असल्याची माहिती मिळाली आहे. या लशी राज्य सरकारला मोफत पुरवल्या जाणार आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरण वाटपाची माहिती राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहून दिली आहे. यामध्ये कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींची माहिती आहे. अगोदर मिळालेल्या माहितीमुळे राज्य सरकारांना योग्य पद्धतीने नियोजन करता येणार आहे.
[read_also content=”केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी लशींच्या तुटवड्याच्या समस्येवर सुचवला उपाय, म्हणाले… https://www.navarashtra.com/latest-news/central-minister-nitin-gadkari-suggestion-to-solve-vaccine-shortage-problem-nrsr-131119.html”]
केंद्राने जाहीर केलेल्या धोरणानुसार प्रत्येक महिन्यात ५० टक्के लशी केंद्र सरकारकडून खरेदी केल्या जातात. या लशी राज्यांना विनामुल्य पुरवल्या जातात. उर्वरित ५० टक्के लशी राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या धोरणानुसार केंद्र सरकारने राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना आगाऊ माहिती दिली आहे.
१ मे ते १५ जूनपर्यंत पुरवण्यात येणारे ५ कोटी ८६ लाख २९ हजार लशींचे डोस राज्यांना मोफत देणार आहे. या व्यतिरिक्त जून अखेर राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांकडून थेट खरेदीसाठी एकूण ४ कोटी ८७ लाख ५५ हजार लशी उपलब्ध असतील अशी माहिती लस उत्पादकांकडून देण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.
मार्गदर्शक तत्त्वे-