कोल्हापूर : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधाने ईडीने केलेल्या कारवाईनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच केंद्र विरुद्ध राज्य असा सामना राज्यात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. कोल्हापुरातही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी नवाब मलिकांवरील कारवाईचा निषेध करण्यात आला.
[read_also content=”युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची यादी करुन त्यांना विमानाने मायदेशी आणणार, नितीन गडकरींनी केली राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/india-will-make-list-of-students-stranded-in-ukraine-to-bring-them-back-nrsr-245037.html”]
शिवाजी चौकात झालेल्या या आंदोलनात आंदोलकांनी भाजप आणि ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. bअसून याचा एकत्रितपणे मुकाबला केला जाईल असा इशारा यावेळी आला. लोकांमध्ये जाऊन या कारवाया मागील सत्य पटवून देण्याचा निर्धार देखील यावेळी करण्यात आला. दरम्यान या कारवायांवरून सोशल मीडियावर देखील महाविकास आघाडी आणि आघाडीच्या नेत्यांना बदनाम केले जाते. यापुढे त्यांनाही जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी दिला. मंत्री नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध होते तर मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी कारवाई का केली नाही? असा सवाल मंत्री मुश्रीफ यांनी उपस्थित केला. भाजप कडून कारवायांचा अतिरेक होत असून त्याची माती झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देखील मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
[read_also content=”युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने तात्काळ मायदेशी आणावे; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र https://www.navarashtra.com/latest-news/central-government-should-immediately-repatriate-students-stranded-in-ukraine-congress-state-president-nana-patoles-letter-to-prime-minister-narendra-modi-nrdm-245053.html”]