भटक्या कुत्र्यांबाबत (Stray Dogs)अनेक घटना सध्या समोर येताना दिसत आहेत. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुलांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण ताजं असताना भटक्या कुत्र्यांबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आता आमदार बच्चु कडुंनी (Bacchu Kadu) केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
[read_also content=”तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी शीझान खानला जामीन मंजुर! तीन महिन्यानंतर तुरुंगातून सुटका, भावाला पाहताच बहिणींना अश्रु अनावर https://www.navarashtra.com/crime/sheejan-khanla-bail-granted-in-tunisha-sharma-suicide-case-nrps-374078.html”]
विधानसभेत लक्षवेधीवर बोलताना बच्चू कडू यांनी म्हटलं की, खरे तर भटक्या कुत्र्यावर सोप्पा इलाज आहे. पाळीव कुत्रे रस्त्यांवर येत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. याच्यावर समिती नेमण्यापेक्षा कृती योजना जाहीर करायला हवी. एखाद्या शहरात तसा प्रयोग करण्यात यावा. र
बच्चू कडू म्हणाले की, आसाममध्ये भटक्या कुत्र्यांना मागणी आहे. तिथे त्यांची चांगली किंमत 8 हजार रुपयांपर्यंत मिळू शकते. त्यामुळे राज्यातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येवरही नियंत्रण येणार आहे. कुत्र्यांना आसामला पाठवले पाहिजे. आता हा प्रयोग एकाच शहरात व्हायला हवा, असेही ते म्हणाले.त्यांच्या या वक्तव्यावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला. या विधानावर प्राणी हक्क कार्यकर्ते आणि प्राणीप्रेमींनी तीव्र आक्षेप घेतला असून हे विधान अमानवी आणि निंदनीय असल्याचे म्हटले आहे.






