नांदेड : भोकर तालुक्यातील भोशी या गावातील शेतकरी आता साखर कारखान्याला ऊस न देता गूळ उत्पादकाकडे आपला ऊस देत आहे. कारखानदार ऊस लवकर नेत नसल्याने आणि पैसे वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ऊस गुळ कारखाण्याला देण्याचा निर्णय घेतला. यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात शेतकऱ्यांनी गूळ फॅक्टरीला आपला ऊस देऊन सहकार्य करावे असे देखील आवाहन केले आहे.
[read_also content=”एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे शंभर दिवस पूर्ण, विलीनीकरणाचा तिढा अद्याप कायम https://www.navarashtra.com/beed/marathwada/beed/one-hundred-days-of-st-workers-agitation-completed-nrps-236317.html”]
याबाबच गूळ उत्पादकांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की, कारखानदार ऊस लवकर नेत नसल्याने आणि पैसे वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कुंचबना होत होती. त्यामुळे त्यांनी थेट गूळ उत्पादकांना ऊस विकण्याचा निर्णय घेतला. या भागातील शेतकरी आम्हाला मोठ्या प्रमाणात ऊस देतात. आम्ही या उसाची रीतसर प्रक्रिया करून गूळ उत्पादन करतो. हा गूळ महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये जातो. या गुळाचे कुठलेच साईड इफेक्ट नसून खाण्यासाठी चविष्ट व आरोग्यासाठी चांगला आहे. त्यासाठी ग्राहक आमच्याकडे येऊन गूळ खरेदी करतात. ही प्रक्रिया करण्यासाठी वेगवेगळ्या मशनरी आहेत. जवळपास तीनशे ते चारशे कारागीर मेहनत करतात व अशा लोकांना या गूळ उत्पादक फॅक्टरीने बेरोजगार मुले व मुली यांना रोजगार मिळवून दिला आहे.
[read_also content=”कुठे मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतात, कुठे मृतदेह उंचावर लटकवतात तर कुठे होतात आकाशात अंतिम संस्कार; अंत्यसंस्काराच्या क्रूर आणि भयानक चालीरीती https://www.navarashtra.com/world/cruel-horrible-funeral-rituals-nrvk-236247.html”]