Farmers Flood Compensation: महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! केंद्र सरकारकडून 1,566 कोटींचा आपत्ती प्रतिसाद निधी मंजूर
Farmers Flood Compensation in Maharashtra: केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी वित्त वर्ष 2025-26 साठी महाराष्ट्र राज्याला राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची घोषणा केली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) अंतर्गत केंद्राच्या हिस्स्याच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये एकूण 1,566.40 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यंदाच्या मान्सून काळात अतिवृष्टी आणि पूरामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणात नागरिक बाधित झाले आहेत. या नागरिकांना तात्काळ मदत आणि पुनर्वसनासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यामुळे नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यात या वर्षी पाावसाळ्यात राज्यभरातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. अनेक जिल्ह्यात पुरस्थिती निर्णाण झाली होती. पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे मराठवाडा आणि सोलापूर भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. राज्यातील या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने २,२१५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. राज्य सरकारनंतर आता केंद्र सरकारने मदतीच्या दुसऱ्या हफ्त्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी १,५६६.४० कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मान्सून काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने एनडीआरएफचा दुसरा अग्रिम हप्ता म्हणून आणखी 1566.40 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर केले आहेत. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मी नितांत आभारी आहे. ही अग्रिम मदत असून अंतिम मदत प्राप्त करण्यासंदर्भातील प्रक्रिया अजून सुरू सुरू आहे.”
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा ५ ऑक्टोबरला महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्याच्या कृषीक्षेत्रासाठी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. अमित शाहांनी त्यांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यादरम्यान, गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी व्यापक बैठका घेतल्या. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने बाधित क्षेत्रांचा सविस्तर अहवाल सादर करावा त्यातून केंद्र सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करू शकेल, अस पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं.
Winter Special : थंडीच्या वातावरणात घरी बनवा पौष्टिक अन् कुरकुरीत ‘पालक वडे’; नोट करा रेसिपी
या वर्षी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने एकूण १,९५०.८० कोटी रुपयांची आपत्कालीन आर्थिक मदत मंजूर केली आहे. यामध्ये महाराष्ट्राला १,५६६.४० कोटी रुपये आणि कर्नाटकला ३८४.४० कोटी रुपये मिळणार आहेत. या निधीचा उपयोग नैऋत्य मान्सूनदरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांमध्ये तात्काळ मदत पुरविण्यासाठी केला जाणार आहे.
केंद्र सरकारने यावर्षी आपत्ती व्यवस्थापनासाठी आधीच मोठ्या प्रमाणात निधी वितरित केला आहे. एसडीआरएफ (State Disaster Response Fund) अंतर्गत २७ राज्यांना १३,६०३.२० कोटी रुपये, तर एनडीआरएफ (National Disaster Response Fund) अंतर्गत १५ राज्यांना २,१८९.२८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
याशिवाय, राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी (SDMF) मधून २१ राज्यांना ४,५७१.३० कोटी रुपये, आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधी (NDMF) मधून नऊ राज्यांना ३७२.०९ कोटी रुपये केंद्राने वितरित केले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि प्रभावित भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.