पुणे : आयपीएल २०२२ चा पाचवा सामना आज होणार आहे. यामध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) हे संघ आमनेसामने येणार आहेत. या हंगामात दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना असेल, जो जिंकून संघांना त्यांच्या मोहिमेची सुरुवात करायची आहे. हैदराबाद आणि राजस्थानच्या संघात अनेक जबरदस्त खेळाडू आहेत, जे या सामन्याला कलाटणी देण्यास सक्षम आहेत. या सामन्यात कोणत्या खेळाडूच्या बॅटने धावा काढल्या, तर कोणता खेळाडू सर्वाधिक विकेट घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. चाहत्यांमध्येही या सामन्याची प्रचंड उत्सुकता आहे. या सामन्याशी संबंधित संपूर्ण माहिती देत आहे.
आज संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हा सामना रंगणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे.
जर तुम्हाला हैदराबाद आणि राजस्थानच्या सामन्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर त्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.
तुम्ही ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’ वर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याचा आनंद घेऊ शकता.