तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला (फोटो- istockphoto)
पिंपरी: रागाने बघितल्याच्या कारणावरून चौघांनी एका तरुणावर कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. ५) रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास जुनी सांगवी येथे घडली.
अनिष धनंजय ढवळे (वय २१, रा. जुनी सांगवी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शैबाज शेख (वय २१, रा. बोपोडी), विराज काटे (वय २०, रा. औंध), आदित्य, बल्ल्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिष हे जुनी सांगवी येथे ओम कलेक्शन दुकानासमोर भेळ खात थांबले होते. तिथे आरोपी आले. अनिष हे आरोपींकडे रागाने बघत असल्याच्या संशयावरून आरोपींनी अनिष यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यात अनिष गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी कुऱ्हाड हवेत फिरवून दहशत निर्माण केली. पोलिसांनी विराज काटे याला अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.