Gautam Gambhir Met Union Home Minister Amit Shah : भारतीय संघाच्या हेडकोच पदावर लवकरच विराजमान होणाऱ्या गौतम गंभीर याने केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेत, निवडणुकीच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. अमित शहांचे नेतृत्व देशाला स्थैर्य आणि सुरक्षा देण्यासाठी बळकटी देईल अशी अपेक्षा गौतम गंभीर याने व्यक्त केली. अशी पोस्ट सुद्धा गौतम गंभीर याने त्याच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून टाकली आहे. नुकतेच बीसीसीआय सचिव जय शहा यांच्याद्वारे गौतम गंभीर याची भारतीय संघाच्या हेडकोचपदावर नियुक्ती झाली आहे. त्यानंतर गौतम गंभीर याची अमित शहांना भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
राहुल द्रविड विश्वकपपर्यंत असणार हेडकोच
सध्याचे हेड कोच राहुल द्रविड याची मुदत टी-20 विश्वकपनंतर संपणार आहे. राहुल द्रविड याने हेडकोच मुदतवाढीसाठी अर्ज केला नसल्यामुळे आता गौतम गंभीरच टीम इंडियाचे हेडकोच असणार आहेत. गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार, गौतम गंभीर याने पदावर बसण्यापूर्वी काही अटी BCCI समोर ठेवल्या होत्या.
सर्व मागण्या बीसीसीआयने केल्या मान्य
मुख्य प्रशिक्षकपदासाठी गंभीरने बीसीसीआयकडे संघावर संपूर्ण नियंत्रण, पांढऱ्या आणि लाल चेंडूसाठी स्वतंत्र संघ यासारख्या काही मागण्या केल्या आहेत. या सर्व मागण्या बीसीसीआयने मान्य केल्या आहेत आणि त्याची नियुक्ती करण्यास उत्सुक आहे. बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले होते, ज्याची अंतिम मुदत 27 मे होती. नोकरीच्या वर्णनानुसार, नवीन भारतीय पुरुष मुख्य प्रशिक्षक जुलै 2024 ते डिसेंबर 2027 या तीनही फॉरमॅटसाठी कार्यरत असेल.
राहुल द्रविडचा करार संपणार
भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा करार 2021 च्या T20 विश्वचषकानंतर नोव्हेंबरमध्ये सुरू झाला आणि 2023 च्या मायदेशातील एकदिवसीय विश्वचषकाने संपेल. मात्र, ती यंदाच्या T20 विश्वचषक स्पर्धेपर्यंत वाढवण्यात आली. नुकतेच गौतम गंभीरने एका कार्यक्रमादरम्यान सुचवले होते की, ‘राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक होण्यापेक्षा मोठा सन्मान नाही.’ 42 वर्षीय म्हणाला होता, “मला भारतीय संघाचे प्रशिक्षक बनायला आवडेल. तुमच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक होण्यापेक्षा मोठा सन्मान नाही. तुम्ही 140 कोटी भारतीयांचे आणि जगभरातील लोकांचे प्रतिनिधित्व करत आहात.”