मुंबई : वजन खूप वाढलं (Weight Gain), लठ्ठपणा आला की मग आपल्या लक्षात येतं की, आपण वजन कमी करायला हवं. मग एक्ससाईज (Exercise) डॉक्टरांचा सल्ला, योगा, व्यायाम असे कितीतरी प्रकार आपण करून बघतो. मात्र तरीदेखील वजन काही कमी होत नाही.
अनेक घरगुती उपायही (Home Remedies) आपण करतो. मात्र त्यानेही वजनावर काही परिणाम (Effect on Weight) होत नाही. पण तुम्ही चांगली झोप (Sleep) घेतली तरी तुमचं वजन (Sleep for weight loss) कमी होऊ शकतं, हे तुम्हाला माहिती आहे का?
पुरेशी झोप घेतल्याने वजन कमी होण्यास मदत होते, हे नुकत्याच झालेल्या एका संशोधनात दिसून आलं आहे. अमेरिकेमधील क्लीवलॅन्ड विश्वविद्यालयाच्या पल्मोनरी ऍन्ड क्रिटीकल केअर मेडिसिन विभागाच्या डॉक्टरांनी या संदर्भामध्ये संशोधन केलं आहे.
[read_also content=”हे आहेत सोयाबीनचे फायदे; कर्करोगावरही ठरतेय उपयुक्त https://www.navarashtra.com/latest-news/these-are-the-tremendous-benefits-of-soybeans-it-is-also-useful-for-cancer-nrvb-141694.html”]
मीडिया रिपोर्टनुसार तब्बल सोळा वर्ष ६०,००० नर्सेसवर या संदर्भात संशोधन करण्यात आलं. काही नर्स दिवसातून ५ तास झोपायच्या. त्यांची झोप रात्री पूर्ण होत नव्हती तर, ७ तास पूर्ण झोप घेणाऱ्या महिला या दोन्हींमध्ये तुलना करण्यात आली. त्यावेळी कमी झोप घेणाऱ्या महिलांमध्ये वजन वाढण्याची समस्या दिसून आली. अपुऱ्या झोपेमुळे महिलांमध्ये वजन वाढण्याची समस्या दिसून येते.
झोपेच्या काळात लॅप्टिन आणि घ्रेलिन तयार होत असतात. अपुऱ्या झोपेमुळे हे हार्मोन काम करत नाहीत. अपुरी झाल्यामुळे भूक लागणं किंवा जेवण घेणे यावर नियंत्रण करणारे हे हार्मोन्स काम करणं बंद करतात. आपल्या पोटामध्ये अन्न असेल त्यावेळेस ग्रेनीलची मात्रा वाढायला लागते आणि जेवल्यानंतर लॅप्टिन नावाचा हार्मोन रिलीज होतो. जो भूक कमी करतो. याच हार्मोनमुळे आपल्या मेंदूला पोट भरल्याचे संकेत जात असतात. मात्र जेव्हा आपली झोप अपुरी असते त्यावेळेस हे दोन्ही हार्मोन्स कमी होतात आणि आपल्या भुकेवर कंट्रोल राहत नाही.
झोप कमी होत असेल तर शरीर स्वतःलाच आपले मसल्स कमी करा सांगतं. झोपेच्या काळात आपले मसल्स दुरुस्त होत असतात. शरीराला आवश्यक असणारी झोप घेतली नाही तर, मसल्स रिपेयर करण्याचा कालावधी शरीराला मिळत नाही आणि त्यामुळे मसल्स कमजोर व्हायला लागतात. यामुळेच अपुरी झोप घेणार्या लोकांना व्यायाम किंवा एक्ससाईज करतानाही अडचणी येतात.
[read_also content=”ही गोष्ट खाल्याने कायमच राहाल तंदुरुस्त ; फायदे ऐकून आश्चर्यचकित झाला नाही तर नवलच https://www.navarashtra.com/latest-news/eating-flex-seeds-will-keep-you-fit-forever-these-are-surprised-by-the-benefits-nrvb-140556.html”]
पण जर पुरेशी झोप घेतली तर हे सर्व टाळता येईल. झोपलात तर भूकेवर नियंत्रण करणारे हार्मोन्स काम करतील आणि तुमच्या पोटात फार खाणं जाणार नाही. शिवाय नीट झोप गेतल्याने मसल्स मजबूत राहतील आणि व्यायाम करण्यातही तुम्हाला अडचण येणार नाही. परिणामी तुमचं वजन कमी होईल.
health tips sleep and weight loss sleep helps for lose weight






