सोलापूर : मुंबईच्या आझाद मैदानावरील छत्रपती संभाजीराजांच्या अमरण उपोषण आंदोलनाला पाठिंबा म्हणून सोलापुरात शेकडो तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक आमरण ठिय्या उपोषण सुरू केले आहे. मागील अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, अनेक अटी, समस्यांना तोंड देवून सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यानं शेवटचा पर्याय म्हणून खासदार संभाजीराजे छत्रपती हे आजपासून आमरण उपोषणाला बसले आहेत.
एसबीसीएसमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी शासनाकडून आर्थिक तरदूद करण्यात यावी. कोपर्डीच्या भगिणीला न्याय द्यावा. यासह अन्य मागण्यांसाठी आज खासदार छत्रपती संभाजीराजे आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करत आहेत. आरक्षणाचे जनक असणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजांना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाविरोधात आंदोलन करावे लागत आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सोलापुरात शेकडो तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट येथे आंदोलनास सुरुवात केली आहे.
[read_also content=”युद्ध सुरूच, मात्र युक्रेनमधून हृदय पिळवटून टाकणारी दृश्ये व्हायरल https://www.navarashtra.com/latest-news/russia-ukraine-war/ukrain-russia-conflict-emotional-videos-viral-from-ukrain-nrak-245460.html”]