काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
नितीन सावंत यांनी कर्जत येथील शिवालय कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. पक्षाचे स्थानिक नेते बाबू घारे आणि माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत यांनी यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर टीका केली. यावेळी मंगेश काळोखे हत्या प्रकरणात सोशल मीडियावरुन बदनामी केली जात असल्याचा आरोप केला. मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर मागील 4 दिवसांपासून आम्ही कोणतेही राजकारण न करता पीडित कुटुंबाच्या दु:खात सहभागी होण्याची भूमिका घेतली होती. मात्र काही लोकांनी या घटनेचा वापर करून राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. असल्याचे सावंत म्हणाले.
यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, या हत्या प्रकरणानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही समाज माध्यमांवर किंवा इतर ठिकाणी माध्यमांसमोर बाईट दिली नाही. कारण ही घटना मन हेलावून टाकणारी आहे. पोलिसांनी आम्हाला विनंती केली. सोशल मीडियावर किंवा इतर कुठे व्यक्त होऊ नका, संयम बाळगा त्यानुसार आम्ही कुठे व्यक्त झालो नाही. पण काल परवा पासून ज्यांना दु:ख बाजूला ठेवून राजकारण करायचं आहे. त्यांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला बदनाम करण्याचे काम सुरु केलं आहे. अशी टिका यावेळी सावंत यांनी आमदार थोरवे यांच्यावर केली.
शिवसेना आणि शिवसैनिक यांना बाळासाहेबांनी सांगितले होते. माझ्यानंतर आदित्यला सांभाळा उद्धवला सांभाळा आज देखील इथे असणारा प्रत्येक शिवसैनिक आज पण त्याच विचारावर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे पक्षाच्या सर्वात कठीण काळात ठामपणे उभे आहेत. पण सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या पोस्ट टाकणारे हे शिवसैनिक आहेत काय ? असा सवाल सावंत यांनी केला.
नितीन सावंत म्हणाले, आज जी घटना घडली त्यात राजकारण झालं नाही पाहिजे हे मनापासून वाटत होतं. पण आपल्या तालुक्याचा इतिहासच आहे, २००९ पासून प्रत्येक वेळी कुठल्या गावात घटना झाली की त्यात महेंद्र थोरवे यांनी नाहक त्यांच्या विरोधकांचे नाव गोवले. शिवसैनिकांवर वेगवेगळ्या केसेस मध्ये खोटे गुन्हे दाखल केले. तालुक्यात चुकीच्या घटनात राजकारण करायचे काम विरोधकांना गुंतविण्याचे काम करणऱ्या वृत्तीला ठेचण्याचं काम करण्याची वेळ आली आहे. तालुक्यात मागील १० ते १५ वर्षे याच पद्धतीने ते काम करत आहेत, असा आरोप देखील यावेळी सावंत यांनी केला.
मंगेश काळोखे हत्या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा होईलच, पण महेद्र थोरवे राजकीय हेतूने सुधाकर घारे, भरत भगत यांच्यावर आरोप करत आहेत. राजकारणातील विरोधकांना संपविण्यासाठी थोरवे असे करतात. घारे यांनी कर्जत नगर परिषदेच्या निवडणूकीत थोरवे यांचा पराभव केला. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आपला निभाव लागणार नाही. हे थोरवे .यांना स्पष्टपणे जाणीव आहे, येणाऱ्या काळात सत्य काय आहे ते जनतेसमोर येणारच आहे. त्या दिवशी थोरवे यांचा खरा चेहरा कर्जत खालापूरच्या जनतेसमोर येईल असे, नितीन सावंत म्हणाले.
यावेळी बोलताना नितीन सावंत म्हणाले की, जे खरे आरोपी आहेत, त्यांना शिक्षा व्हावी, ही खासदार सुनील तटकरे यांची भूमिका आहे, आणि आमची देखील तीच भूमिका आहे. न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे. पोलिस प्रशासन काम करत आहे, सत्य हे सत्यच असते, ते समोर येणार आहे. पण एखाद्या घटनेचे किती राजकारण करावे ते प्रत्येकाला समजले पाहिजे.
यावेळी नितीन सावंत म्हणाले की, पोलिस प्रशासनाला विनंती आहे, तुम्ही विनंती केली त्याप्रमाणे आम्ही सोशल मीडियावर व्यक्त झालो नाही. पण ते जे करत आहेत. मात्र आमची सोशल मीडियावर बदनामी केली जात आहे, हे थांबवले नाही तर पोलिस प्रशासना विरोधात ५ हजार लोकांचा मोर्चा आम्हाला काढावा लागेल.






