कॅाफी प्रेमींसाठी स्टारबक्स (Starbucks) हे नाव नवं नाही. कॅाफीसोबत चांगलं वातावरण मिळतं यासाठी अल्पवधीत युवकांच्या ते पसंतीस पडलं आहे. आता या स्टारबक्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारपदी
भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिम्हन (Laxman Narasimhan) यांची निवड करण्यात आली आहे.
ऑक्टोबर महिन्यामध्ये लक्ष्मण नरसिम्हन कार्यभार स्विकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. स्टारबक्स कंपनीने सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हॉवर्ड शुल्त्स यांना हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी घेण्यास सांगितलं आहे.
[read_also content=”लाडक्या लालबागच्या राजाकडं एका आईनं व्यक्त केली ही इच्छा…पत्र व्हायरल https://www.navarashtra.com/maharashtra/a-mother-wrote-a-letter-to-lalbaugcha-rahja-ganpati-nrps-321561.html”]
‘स्टारबक्स कंपनीला लक्ष्मण नरसिम्हन यांच्या स्वरुपात एक असाधारण व्यक्तीमत्व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून लाभले आहेत. त्यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. असं स्टारबक्स बोर्डाचे अध्यक्ष मेलोडी हॉब्सन यांनी म्हटलं आहे.
[read_also content=”पंजाबमधल्या महिला आमदाराला नवऱ्याकडून मारहाण, महिला आयोगाने घेतली दखल https://www.navarashtra.com/india/aam-admi-party-mla-baljinder-kaur-slapped-by-her-husband-nrsr-321674.html”]