गणेशोत्सवात गणपती बाप्पाला मोदकांचा प्रसाद दाखवताना मुलांच्या आवडीचा देखील विचार करा आणि ट्राय करा स्पेशल ओरीओ बिस्कीटांचे मोदक.
साहित्य:
● 3 ओरिओ बिस्किटांचे पॅकेट
● 4 चमचे दुधाची क्रीम
● 1 चमचा डेसिकेटेड कोकोनट
● 1/2 चमचा मिल्कमेड / साखर पावडर
कृती:
सर्वप्रथम ओरिओ बिस्कीट घेऊन त्यातलं क्रीम वेगळं व ओरिओ बिस्कीट वेगळे करून त्याचे मिक्सर मधून पावडर तयार करून घेणे.
या बिस्किटाच्या क्रीम मध्ये डेसिकेटेड कोकोनट मिल्कमेड किंवा साखर पावडर टाकून सारण तयार करून घ्यावे.
आता मिक्सरमध्ये बारीक केलेल्या बिस्किटांच्या पावडर ला दुधाच्या क्रीम ने थोडे थोडे चमच्याने टाकून त्याचा गोळा तयार करून घ्यावा.
नंतर त्या गोळ्याचे काप करून त्याचे मोदकासाठी एक सारखे भाग तयार करून घ्यावे.व एक एक गोळा घेऊन हाताने त्याची लाटी तयार करून त्यामध्ये बिस्किटांची काढून ठेवलेल्या क्रीमचे सारण भरावे आणि सुरेख मोदक तयार करून घ्यावे.
मोदकाला पाकळ्या दिसण्यासाठी तुम्ही टुथपिकचा वापर करू शकता.अशाप्रकारे सगळे मोदक तयार करून घ्यावेत. आता आपले ओरिओ बिस्किटांचे मोदक तयार आहेत. तेव्हा बाप्पांना नैवेद्य दाखवून सगळ्यांनी प्रसाद ग्रहण करावा.
Web Title: Make a special oreo biscuits modak for ganapati nrrd