नवी मुंबई: हिंदू सणांपैकी प्रमुख असलेला हा होळीचा सण दरवर्षी अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे (MLA Manda Mhatre) यांनी नवी मुंबईतील (Navi Mumbai) महिलांसह होळी व धुलीवंदनाचा सण सीबीडी-बेलापूर येथे साजरा केला. धुळवडीनिमित्त (Dhulvad Celebration)आ.मंदा म्हात्रे ब्रास बँडवर थिरकताना दिसल्या. यावेळी आपल्या पारंपारिक वेशभूषेत आलेल्या बंजारा समाज, राजस्थानी महिला व कोळी महिला या प्रमुख आकर्षण होत्या. कोळी बँड तसेच राजस्थानी गाण्यांच्या ठेक्यावर सर्वांचेच पाय थिरकताना दिसले. यावेळी भाजपा युवती प्रमुख सुहासिनी नायडू, अश्विनी घंगाळे, लाजवंती भोसले, ममता सिंग तसेच शेकडो महिला उपस्थित होत्या.
यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, सालाबादप्रमाणे यावर्षीही होळी व धुलीवंदनाचा सण साजरा केला जात आहे. कोरोना काळात महाभयंकर परिस्थिती असल्यामुळे हा सण साजरा करण्यात आला नव्हता. मात्र बंजारा समाज, राजस्थानी लोकगीते, कोळी बँडसोबत धुमधडाक्यात रंगांची उधळण करत हा सण आज साजरा करण्यात आलेला आहे.
पाहा VIDEO :
होळी हा रंगांचा सण आहे परंतु सावधगिरी पाळणे अधिक गरजेचे आहे. कारण आजकाल रसायनयुक्त रंगामुळे खूप नुकसानांना सामोरे जावे लागते. चुकीच्या रंगामुळे डोळ्यांना हानी पोहचू शकते त्यामुळे रसायन मिसळले रंग न वापरता ऑरगॅनिक सेंद्रिय रंगाचा वापर करावा. तसेच सावधानतेने एकमेकांना रंग लावावे. कोणाची इच्छा नसेल तर उगाच जबरदस्ती रंग लावू नये. शक्य असेल तर फुलांच्या वर्षावाने धुळवड साजरी करावी. आजकाल होळीसारख्या सणांना भांडण होण्याचे प्रमाण वाढले आहे. होळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे आणि तो तसाच साजरा करावा, असे आवाहन आमदार मंदा म्हात्रे यांनी यावेळी नागरिकांना केले.
Web Title: Mla manda mhatre celebrated dhulvad in navi mumbai nrsr